महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कोरोनाचा धसका; शहरात आढळला कोरोनाचा रुग्ण, जिल्हाधिकाऱ्यांनी परिसर केला 'प्रतिबंधात्मक क्षेत्र' घोषित

कोरोनाचा संसर्ग झाल्याचा अहवाल प्राप्त झाल्याने जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारुड यांनी रुग्ण राहत असलेला परिसर प्रतिबंधात्मक क्षेत्र म्हणून जाहीर केला. प्रतिबंधात्मक क्षेत्रात कोणालाही ये-जा करता येणार नाही. सर्व प्रकारच्या वाहनांना या क्षेत्रात प्रतिबंध असेल.

Nand
प्रतिबंधात्मक क्षेत्राचे फलक लावताना अधिकारी

By

Published : Apr 22, 2020, 10:09 AM IST

नंदुरबार- शहरातील एका व्यक्तीला कोरोनाचा संसर्ग झाल्याचा अहवाल प्राप्त झाल्याने जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारुड यांनी रुग्ण राहत असलेला परिसर प्रतिबंधात्मक क्षेत्र म्हणून जाहीर केला. या भागात हाट दरवाजा, गुजर गल्ली, कुंभारवाडा, दवे इंजिनिअर परिसर येथून बालाजी वाडा परिसर, मण्यार मोहल्ला, खिलाफत चौक, सुतार मोहल्ला, घोडापीर मोहल्ला, इलाही चौक, बागुल राईस मिल परिसर, अलीसाहब मोहल्ला, कसाई मोहल्ला, करिम मंजील आणि दखणी गल्ली हे प्रतिबंधात्मक क्षेत्र म्हणून जाहीर केले आहे.

या परिसराच्या उत्तरेकडील मेवालाल सेठ यांचे वखारपासून दक्षिणेस मुख्य रस्त्याचे जेपीएन हॉस्पीटल, जुने कोर्ट ते मंगळबाजार, मराठा व्यायामशाळा, सिद्धीविनायक चौक ते शिवाजी रोडपर्यंत भाग बफर झोन म्हणून जाहीर करण्यात आला आहे. त्यासोबत पुर्वेकडील बंधरहट्टी भिलाटी, गुरव गल्ली, योगेश्वरी माता मंदीर, स्वामी विवेकानंद हायस्कुल, धानोरा नाका, पाताळगंगा नदी पावेतो, रज्जाक पार्क, लहान माळीवाडा भिलाटी, दक्षिणेकडील रज्जाक पार्क, बिफ मार्केट, मेहतर वस्ती, गोंधळ गल्ली, भरवाड वस्ती, मरीमाता मंदीर, दालमिल, पटेल छात्रालय ते संत रोहिदास चौक ते हाट दरवाजा, तेथून पाण्याची टाकी, नुतन शाळा, मेवालाल सेठ यांची वखार आणि पश्चिमेकडील बंधरहट्टी भिलाटी, न. पा. शाळा, काळी मस्जीद, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यालय, मटन मार्केट, जळका बाजार, दोषाह तकीया, दादा गणपतीपर्यंतचे क्षेत्रदेखील बफर झोन म्हणून जाहीर केले आहे.

प्रतिबंधात्मक क्षेत्रात कोणालाही ये-जा करता येणार नाही. सर्व प्रकारच्या वाहनांना या क्षेत्रात प्रतिबंध असेल. अत्यावश्यक सेवा सुरळीत राहण्यास मुभा राहील. अत्यावश्यक सेवा पुरविणाऱ्यांची तपासणी करणे बंधनकारक राहील. अत्यावश्यक सेवेसाठी संबंधितांना सुरक्षा पास उपलब्ध करून देण्यात येतील. प्रतिबंधीत क्षेत्रात येण्याजाण्याच्या ठिकाणी उष्म चाचणी करणे आवश्यक राहील. आरोग्य सेवकांनी ये-जा करणाऱ्या सर्वांची छाननी करावी. प्रतिबंधात्मक क्षेत्रातून बाहेर जाणाऱ्या अत्यावश्यक सेवेतील व्यक्तींची नोंद घेण्यात येईल. भौगोलीक विलगीकरण क्षेत्रात जाणाऱ्या व्यक्तींना औषधांचा डोस देण्यात येईल. या क्षेत्रातून बाहेर जाणाऱ्या वाहनांचे निर्जंतुकीकरण करणे आवश्यक राहील. अत्यावश्यक सेवेचा पुरवठा करताना सोशल डिस्टन्सिंग करणे आवश्यक राहील. आदेशाचा भंग केल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details