महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

शहाद्यात घरात घुसली नाग-नागिनीची जोडी; थरार कॅमेऱ्यात कैद - cobra couple found in shahada

शहादा तालुक्यातील बिलाडी गावच्या परिसरात नाग व नागिनीची जोडी आढळून आली. पदम भिल यांच्या घरात त्यांचा लहान मुलगा झोपला असाताना ही जोडी दिसली. कुटुंबातील सदस्य यामुळे खूप घाबरले होते. मात्र, मोठा अनर्थ टळला आहे.

शहाद्यात नाग व नागिनीची जोडी आढळली

By

Published : Nov 14, 2019, 9:21 AM IST

नंदुरबार -शहादा तालुक्यातील बिलाडी गावच्या परिसरात नाग व नागिनीची जोडी आढळून आली. पदम भिल यांच्या घरात त्यांचा लहान मुलगा झोपला असाताना ही जोडी दिसली. कुटुंबातील सदस्य यामुळे खूप घाबरले होते. मात्र, मोठा अनर्थ टळला आहे.

हेही वाचा - अमेरिकेच्या बंदीनंतरही हुवाईची चांगली कामगिरी; कर्मचाऱ्यांना देणार २०४४ कोटींचा बोनस

नाग व नागिनीची जोडी घरात घुसली असताना मुलगा घरात झोपलेला होता. त्यामुळे भीतीने त्याचे आई व वडील सैरावैरा धावू लागले. याचवेळी परिसरातील काही नागरिकांनी शहादा येथील सर्पमित्राला बोलविले. त्यांनी घरातील मुलाला सुरक्षित बाहेर काढले. सर्पमित्रांनी काहीवेळ नाग व नागिन या जोडीचा शोध घेतला जवळपास तीन ते चार फूट लांबीच्या नागांची ही जोड पकडण्यात त्यांना यश आले.

पकडलेल्या नाग व नागिनीला पाहण्यासाठी परिसरातील नागरिकांनी एकच गर्दी केली होती. पकडलेल्या या नागाच्या जोडीला नंतर वनविभागाच्या ताब्यात देऊन जंगलात सोडून देण्यात आले आहे.

हेही वाचा - 'आमची भेट झाली हिच मोठी सकारात्मक बाब'

ABOUT THE AUTHOR

...view details