महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते जलतरण तलावाचे उद्घाटन आणि नंदुरबार पालिकेच्या नूतन इमारतीचे भूमिपूजन - CM visits Nandurbar

नंदुरबार नगरपालिकेने उभारलेल्या स्व. भाळासाहेब ठाकरे जलतरण तलाव आणि पालिकेच्या नवीन वास्तूचे भूमिपूजन आणि उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे १५ तारखेला नंदुरबार दौऱ्यावर येणार आहेत.

cm-visits-nandurbar-on-15-th
मुख्यमंत्री उध्दव ठाकर यांच्या हस्ते जलतरण तलावाचे उद्घाटन व नंदुरबार पालिकेच्या नवीन इमारतीचे भूमिपूजन

By

Published : Feb 12, 2020, 1:38 PM IST

नंदुरबार - नगरपालिकेने उभारलेल्या स्व. बाळासाहेब ठाकरे जलतरण तलाव आणि पालिकेच्या नवीन वास्तू इमारतीचे उद्घाटन व भूमिपूजनासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे दिनांक 15 फेब्रुवारीला नंदुरबारला येत आहे. त्यांच्या हस्ते जलतरण तलावाच उद्घाटन आणि पालिक इमारती भूमिपूजन होणार आहे, अशी माहिती शिवसेनेचे नेते माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी दिली.

मुख्यमंत्री उध्दव ठाकर यांच्या हस्ते जलतरण तलावाचे उद्घाटन व नंदुरबार पालिकेच्या नवीन इमारतीचे भूमिपूजन

नंदुरबार येथील छत्रपती शिवाजी महाराज नाट्यमंदिरात पत्रपरिषद घेण्यात आली. याप्रसंगी शिवसेनेचे नेते माजी आमदार. चंद्रकांत रघुवंशी, शिवसेना जिल्हाप्रमुख डॉ. विक्रांत मोरे, नगरसेवक कुणाल वसावे, कैलास पाटील, दीपक दीघे, अशोक राजपूत आदी उपस्थित होते. यावेळी माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी सांगितले की, नंदुरबार नगरपालिकेने संजय टाऊन हॉलच्या परिसरात आंतरराष्ट्रीय पातळीप्रमाणेच नंदुरबारात जलतरण तलाव बनवला आहे. या तलावामुळे खेळाडूंना प्रेरणा मिळणार आहे. जलतरण तलावास स्व.बाळासाहेब ठाकरे जलतरण तलाव असे नाव देण्यात आले असून या तलावाच्या उद्घाटनासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे दिनांक 15 फेब्रुवारीला नंदुरबारात येत आहेत. तर याचदिवशी नगरपालिकेला मिळालेल्या जुन्या कोर्टाच्या जागेवर पालिकेची भव्यदिव्य वास्तू (इमारत) उभारण्याच्या कामाचे भूमिपूजन होईल.

15 तारखेला सकाळी 11 दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे पोलीस कवायत मैदानाच्या हेलीपॅडवर आगमन होणार आहे. त्यानंतर तेथून गाडीने जलतरण तलावाच्या ठिकाणी येतील. सुरुवातीला पाहणी केल्यानंतर लागलीच स्व.बाळासाहेब ठाकरे जलतरण तलावाचे उद्घाटन करतील. तेथून कार्यक्रम झाल्यावर नगरपालिकेच्या नवीन वास्तू कामाचे भूमिपूजन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होईल. त्यानंतर शहरातील जीटीपी महाविद्यालयाच्या मैदानात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा होणार आहे, असा नियोजित कार्यक्रम आहे.

या कार्यक्रमासाठी खासदार संजय राऊत, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, दादा भुसे, अब्दुल सत्तार, अ‍ॅड.के.सी.पाडवी, मिलींद नार्वेकर, बबनराव थोरात हे देखील येणार आहेत. खासदार डॉ.हिना गावित, आमदार डॉ. विजयकुमार गावित, आमदार राजेश पाडवी, आमदार शिरीषकुमार नाईक, जिल्हा परीषद अध्यक्षा अ‍ॅड सिमा वळवी, प्रशासनातील जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारुड, मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, पोलीस अधिक्षक महेंद्र पंडीत आदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतील. या कार्यक्रमास शहरवासियांनी उपस्थित रहावे, असेही आवाहन माजी आमदार रघुवंशींनी यावेळी केले.

ABOUT THE AUTHOR

...view details