नंदुरबार - नगरपरिषदेच्या नूतन प्रशासकीय इमारतीचे भूमिपूजन व दिवगंत बाळासाहेब ठाकरे जलतरण तलावाचा लोकार्पण सोहळा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ऑनलाइन कॉन्फरन्सिंगद्वारे पार पडला. याप्रसंगी जिल्ह्याचे लोकप्रतिनिधींसह अधिकारी उपस्थित होते.
छत्रपती शिवाजी महाराज नाट्य मंदिरात आयोजित या कार्यक्रमास माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी, नगराध्यक्षा रत्ना रघुवंशी, आमदार शिरीष नाईक, जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष सीमा वळवी, आमदार राजेश पाडवी, जिल्हाप्रमुख विक्रांत मोरे, आमशा पाडवी, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष राम रघुवंशी, मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावंडे आदी मान्यवर उपस्थित होते.
मुख्यमंत्र्यांनी केले जलतरण तलावाचे लोकार्पण
नंदुरबार शहरातील मध्यवर्ती भागात असलेल्या दिवगंत बाळासाहेब ठाकरे जलतरण तलावाचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते लोकार्पण सोहळा याप्रसंगी झाला.