नंदुरबार - नवापूर शहरातील शेफाली पार्क परिसरातील कापड व्यापाराचे बंद घर फोडून चोरट्यांनी कपाटातील सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम लंपास केली आहे. रुपेश पाटील, असे या व्यापाऱ्याचे नाव आहे. भरदिवसा घडलेल्या या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
नवापूर शहरात कापड व्यापाऱ्याचे भरदिवसा घर फोडले; दागिन्यांसह रोख रक्कम लंपास - चोरी
नवापूर शहरात चोरीच्या घटनेत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहेत. त्यामुळे परिसरात पोलिसांनी अधिक गस्त घालण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
नवापूर शहरात शेपाली पार्क परिसरात कापड व्यापारी रुपेश सतीश पाटील यांचे घर आहे. त्यांची पत्नी योगिता पाटील या शिक्षिका असल्यामुळे उन्हाळ्याच्या सुट्ट्यानिमित्त त्या नाशिक येथे आईकडे गेल्या होत्या. तर पाटील हे आपल्या कापड दुकानात होते. याच संधीचा फायदा घेत चोरट्यांनी भरदिवसा त्यांच्या बंद घराचा कडीकोयंडा तोडून आत प्रवेश केला. त्यांनी घरातील कपाटात असलेले ४० हजार रुपये किंमतीच्या सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह १० हजार रुपये रोख रक्कम लंपास केली.
शहरात चोरीच्या घटनेत मोठ्या प्रमाणात वाढ होत असून भरदिवसा घडलेल्या या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. उन्हाळी सुट्टी असल्यामुळे कॉलनी परिसरात घरांना कुलूप असल्याने कॉलनी परिसरात पोलिसांनी अधिक गस्त घालण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. भुरट्या चोऱ्यांचे प्रमाण रोखण्यासाठी पोलिसांनी ठोस उपाय योजना आखून गस्त वाढवणे जरुरीचे आहे, अशी मागणी नागरिक करत आहेत.