नंदुरबार- जिल्ह्यात गेल्या दोन महिन्यांपासून वातावरणात होणाऱ्या बदलाचा फटका रब्बी हंगामाच्या पिकांना बसत आहे. त्यामुळे शेतकरी चिंतेत आहे. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात रब्बी हंगामात हरभरा, ज्वारी यांची पेरणी करण्यात आली आहे. मात्र, वातावरणात सारखे बदल होत असल्याने सतत ढगाळ वातावरण राहत आहे. त्यामुळे हरभरा पिकांवर मोठ्या प्रमाणात अळीचा प्रादुर्भाव झाला आहे.
ढगाळ वातावरणाचा नंदुरबार जिल्ह्यातील रब्बी हंगामाला फटका हेही वाचा -'मुंबईतील निर्जन स्थळे सुरक्षित करणार'
जिल्ह्यातील खरीप हंगाम हा अतिवृष्टी आणि अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या हातातून गेला होता. त्यामुळे शेतकरी रब्बी हंगाम चांगला येईल अशा अपेक्षेत होता. त्यामुळे नंदुरबार जिल्ह्यात रब्बी हंगामात मोठ्या प्रमाणात हरभरा, गहू, ज्वारी यांची पेरणी करण्यात आली आहे. मात्र, दोन महिन्यांपासून सारखे वातावरणात बदल होत असल्याने सतत ढगाळ वातावरण राहत आहे. त्यामुळे हरभरा आणि ज्वारीच्या पिकांवर अळीचा प्रादुर्भाव झाला आहे.
पिकांवर फवारणी करून अळीचा प्रादुर्भाव कमी होत नसल्याने रब्बी हंगाम धोक्यात आला आहे. ढगाळ वातावरणामुळे थंडीचे प्रमाण कमी झाल्याने गव्हाच्या वाढीवर परिणाम झाला आहे. या वर्षी चांगला पाऊस झाल्याने सर्वच धरणे भरली आहेत. चांगले पाणी उपलब्ध असूनही वातावरणाच्या बदलाचा शेतकऱ्यांना मोठा फटका बसत आहे. यामुळेच हरभरा व गहू यासाख्या पिकांची चांगली वाढ होत नसल्यामुळे उत्पादनात देखील घट होण्याची शक्यता शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे. यंदा अपेक्षेपेक्षा जास्त पाऊस झाल्यामुळे शेतकऱ्यांना खरीप हंगामातून खूप कमी प्रमाणात उत्पन्न मिळाले. वातावरणातील बदलाचा फटका रब्बी हंगामाला बसत असून शेतकरी चिंतेत आहेत.