नंदुरबार- देशातील सर्वात मोठ्या मिरचीची बाजार पेठ आसलेल्या नंदुरबार बाजार समितीत आतापर्यंत 40 हजार क्विंटल लाल मिरचीची खरेदी झाली आहे. बाजारात दररोज २ ते ३ हजार क्विंटलची आवक होत आहे. मात्र, गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी मिर्ची खरेदीत घट झाली आहे. मोठ्या प्रमाणात होणाऱ्या वातावरणातील बदलाचा फटका मिरचीला बसल्यामुळे उत्पादन घटल्याची माहिती समोर आली आहे.
नंदुरबारमध्ये वातावरणातील बदलामुळे मिरची उत्पादन घटले
नंदुरबार बाजार समितीत मागील वर्षी १४ जानेवारीपर्यंत ६० हजार क्विंटल लाल मिरचीची खरेदी केली गेली होती. मात्र, या वर्षी होणाऱ्या वातावरणातील बदलामुळे तब्बल एक महिना उशिरा मिरची खरेदी सुरू झाली असल्याचे बाजार समितीच्या वतीने सांगण्यात आले आहे.
मिर्ची
नंदुरबार बाजार समितीत मागील वर्षी १४ जानेवारी पर्यंत ६० हजार क्विंटल लाल मिरचीची खरेदी केली गेली होती. मात्र, या वर्षी होणाऱ्या वातावरणातील बदलामुळे तब्बल एक महिना उशिरा मिरची खरेदी सुरू झाली असल्याचे बाजार समितीच्या वतीने सांगण्यात आले आहे.
हेही वाचा-नंदुरबार जिल्हा परिषद ; भाजपच्या गटनेतेपदी कुमुदिनी गावित