महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

महाराष्ट्रात महापूर : धुळे, नंदुरबारमधील महाजनादेश यात्रा स्थगित - Flood news

पूर स्थितीचे गांभीर्य लक्षात घेता मुख्यमंत्र्यांनी नंदुरबारचा दौरा रद्द केला असल्याची माहिती पालक मंत्री जयकुमार रावल यांनी दिली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

By

Published : Aug 8, 2019, 4:13 PM IST

Updated : Aug 8, 2019, 5:16 PM IST

नंदुरबार- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा महाजनादेश यात्रा दौरा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. पूर स्थितीचे गांभीर्य लक्षात घेता मुख्यमंत्र्यांनी धुळे आणि नंदुरबारचा दौरा रद्द केला असल्याची माहिती पालक मंत्री जयकुमार रावल यांनी दिली.

मुख्यमंत्र्यांनी 1 ऑगस्टपासून महाजनादेश यात्रा सुरू केली होती. त्याचा पहिल्या टप्प्यातील समारोप नंदुरबार येथे शुक्रवारी होणार होता. परंतु, गेल्या आठवड्यापासून महाराष्ट्रात सुरू असलेल्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. त्यामुळे हा दौरा रद्द करण्यात आला आहे.

नंदुरबारमधील महाजनादेश यात्रा स्थगित

यावेळी नंदुरबारमधील मुख्यमंत्र्यांच्या जाहीर सभेत जिल्ह्यातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माणिकराव गावित यांचे पुत्र भरत गावीत, जिल्हा काँग्रेसचे कार्याध्यक्ष दीपक पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य रामचंद्र पाटील, राष्ट्रवादीचे जिल्हा परिषद सदस्य किरसिंग वसावे, धडगाव तालुक्यातील राष्ट्रवादीचे कार्यकर्ते विजय पराडके या जिल्ह्यातील बड्या नेत्यांसह अनेक कार्यकर्ते मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश करणार होते. मात्र, आता मुख्यमंत्र्यांनी दौरा रद्द केल्यामुळे या नेत्यांचा भाजप प्रवेश हुकला आहे.

Last Updated : Aug 8, 2019, 5:16 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details