महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नंदनगरीत रंगला शिवजन्मोत्सव; मूर्तीची काढण्यात आली मिरवणूक - छत्रपती शिवाजी महारांज

'जय भवानी जय शिवाजीच्या' जयघोषात नंदुरबारमध्ये तिथीनुसार छत्रपती शिवाजी महारांजांची तिथीनुसार जयंती साजरी करण्यात आली. यावेळी प्रतिमापुजनासह विविध कार्यक्रम आणि शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते. शिवजयंतीनिमित्त शहर पोलीसांनी ठिकठिकाणी कडकोट पोलीस बंदोबस्त ठेवला होता.

Chhatrapati Shivaji Maharaj's birth anniversary
नंदनगरीत रंगला शिवजन्मोत्सव

By

Published : Mar 13, 2020, 11:57 AM IST

Updated : Mar 13, 2020, 12:06 PM IST

नंदुरबार - 'जय भवानी जय शिवाजीच्या' जयघोषात नंदुरबारमध्ये तिथीनुसार छत्रपती शिवाजी महाराजांची तिथीनुसार जयंती साजरी करण्यात आली. यावेळी प्रतिमापूजनासह विविध कार्यक्रम आणि शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते. ट्रॅक्टरवर ठेवलेली छत्रपती शिवाजी महाराजांची आकर्षक प्रतिमा आणि साकारलेल्या सजीव देखाव्याने शहरवासीयांचे लक्ष वेधून घेतले.

नंदनगरीत रंगला शिवजन्मोत्सव

शहरातील विविध व्यायामशाळा आणि संघटनांच्यावतीने प्रतिमापुजन, अन्नदान वाटप अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. शिवजयंतीच्या एक दिवस अगोदरच शहरातील चौकांसह रस्त्यांच्या दुभाजकांवर भगवे झेंडे लावण्यात आले होते.

हेही वाचा -मुंबई सेंट्रल स्थानकाला समाजसेवक नाना शंकरशेठ यांचे नाव; मंत्रिमंडळाची मंजुरी

गुरुवारी सकाळी शहरातील विविध चौकात शिव प्रतिमापुजनाचे कार्यक्रम घेण्यात आले. त्यानंतर सायंकाळी व्यायामशाळांनी सजवलेल्या ट्रॅक्टरवरून शिवरायांची मिरवणूक काढण्यात आली. शिवजयंतीनिमित्त शहर पोलीसांनी ठिकठिकाणी कडकोट पोलीस बंदोबस्त ठेवला होता.

Last Updated : Mar 13, 2020, 12:06 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details