महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

काँग्रेसचा बालेकिल्ला ढासळला; अखेर चंद्रकांत रघुवंशी शिवसेनेत - चंद्रकांत रघुवंशी शिवसेनेत

आमदार चंद्रकांत रघुवंशी आपल्या हजारो समर्थकांसह शिवसेना प्रवेश करणार आहेत. रघुवंशी यांच्या शिवसेना प्रवेशाने नंदुरबार जिल्ह्यातील राजकीय समीकरणे गतीने बदलणार असून रघुवंशी यांना मानणारा मोठा गट नंदुरबार जिल्ह्यातील राजकारणात सक्रिय आहे.

आमदार चंद्रकांत रघुवंशी

By

Published : Oct 2, 2019, 9:29 AM IST

नंदुरबार - नंदुरबार जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी आपल्या विधान परिषद सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. ते उद्या(गुरुवारी) मुंबई येथे मातोश्रीवर शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत 'शिवबंधन' बांधणार आहेत. चंद्रकांत रघुवंशी हे तीनदा विधानपरिषद आमदार तर 12 वर्षांपासून जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष म्हणून राहिले आहेत. त्यांच्या पत्नी रत्ना रघुवंशी यासुध्दा तीनदा नगराध्यक्ष पद भूषवित असून त्यांचा पुतण्या व भाचा देखील नगरसेवक आहे. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची पहिली सभा देखील चंद्रकांत रघुवंशी यांनी गाजवली होती.

हेही वाचा -नंदुरबार जिल्ह्यातील तीन विधानसभा क्षेत्रात काँग्रेसचे उमेदवार जाहीर

आमदार रघुवंशी आपल्या हजारो समर्थकांसह शिवसेना प्रवेश करणार आहेत. रघुवंशी यांच्या शिवसेना प्रवेशाने नंदुरबार जिल्ह्यातील राजकीय समीकरणे गतीने बदलणार असून रघुवंशी यांना मानणारा मोठा गट नंदुरबार जिल्ह्यातील राजकारणात सक्रिय आहे. त्यांनी मोदी लाटेच्या काळातही नंदुरबार नगरपालिकेवर आपली एक हाती सत्ता प्रस्थापित केली होती. प्रवेशाचा फायदा युतीला होणार आहे. कारण नंदुरबार जिल्ह्यात सेनेच्या वाटेला अवघा एकच मतदारसंघ आल्याने सेनेला कमी आणि भाजपला त्याचा फायदा जास्त होईल. नंदुरबार विधानसभा मतदारसंघात भाजपचे डॉक्टर विजयकुमार गावित यांचा विजय आता एकतर्फी मानला जात आहे. तर दुसरीकडे नवापूर विधानसभा मतदारसंघात भाजपचे उमेदवार भरत गावित यांना चंद्रकांत रघुवंशी यांच्या सेना प्रवेशाचा सर्वाधिक फायदा होणार आहे. नंदुरबार तालुक्यात त्यांना मानणारा एक मोठा वर्ग असून त्यांच्याकडे तालुक्यातील अनेक ग्रामपंचायती पंचायत समिती सदस्य जिल्हा परिषद सदस्य यांचा मोठा गट असून त्याचा फायदा अप्रत्यक्षरित्या भाजपलाच होईल.

हेही वाचा -नंदुरबार राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्रकुमार गावित बंडखोरीच्या मार्गावर

विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांच्याकडे आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी विधानपरिषद सदस्यपदाचा राजीनामा दिला. यावेळी रघुवंशी यांच्या सोबत शिवसेनेचे नेते सुभाष देसाई, सचिव मिलींद नार्वेकर उपस्थित होते. चंद्रकांत रघुवंशी यांच्या शिवेसेना प्रवेशामुळे काँग्रेसला खिंडार नव्हे तर गडच कोसळल्याचा प्रकार घडला आहे. काँग्रेसला नंदुरबार जिल्ह्यात काँग्रेसची ताकद वाढवून कार्यकर्त्यांना संघटीत ठेवण्यासाठी चंद्रकांत रघुवंशी यांचा सिंहाचा वाटा होता. दरम्यान, यापूर्वी जि.प.चे माजी अध्यक्ष भरत गावित, काँग्रेसचे पक्षाचे जिल्हा कार्यकारी अध्यक्ष दिपक पाटील, जि.प.उपाध्यक्ष रामचंद्र पाटील यांच्यासह अनेकांनी काँग्रेसला रामराम ठोकत भाजपत प्रवेश केला आहे.

दरम्यान, विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर रघुवंशी यांच्या भूमिकेकडे धुळे-नंदुरबार जिल्ह्याचे लक्ष लागून होते. कार्यकर्त्यांच्या गोटातही अस्वस्थता पसरली होती. मातोश्रीवर चंद्रकांत रघुवंशी आपल्या हजारो कार्यकर्त्यांसह पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. त्यातच विधानसभा निवडणुकीत भाजप-सेनेची युती झाल्यामुळे भाजपच्या खांद्याला खांदा लावून शिवसेनेला सुध्दा आता प्रचार करावा लागणार आहे. आता जिल्ह्यात केवळ आमदार सुरुपसिंग नाईक, अ‍ॅड.के.सी.पाडवी, माजी मंत्री पद्माकर वळवी, शिरीषकुमार नाईक यांच्यावरच काँग्रेसची धुरा शिल्लक राहिली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details