नंदूरबार - शहादा शहरातील लायन्स क्लबच्या सखी ग्रुपच्यावतीने आगळ्यावेगळ्या पद्धतीने रक्षाबंधन साजरा करण्यात आले. या ग्रुपच्या सदस्यांनी मागील वर्षी शहरातील विविध मोकळ्या जागेत वृक्षारोपण केले होते. यावेळी या झाडांना राख्या बांधून रक्षाबंधन साजरा करण्यात आले. यातून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला आहे.
झाडांना राखी बांधून नंदूरबारमध्ये रक्षाबंधन साजरा - झाडांना राखी बांधून रक्षाबंधन
शहादा शहरातील लायन्स क्लबच्या सखी ग्रुपच्यावतीने आगळ्यावेगळ्या पद्धतीने रक्षाबंधन साजरा करण्यात आले. या ग्रुपच्या सदस्यांनी मागील वर्षी शहरातील विविध मोकळ्या जागेत वृक्षारोपण केले होते. यावेळी या झाडांना राख्या बांधून रक्षाबंधन साजरा करण्यात आले. यातून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला आहे.
सखी ग्रुपच्यावतीने दरवर्षी आगळ्यावेगळ्या पद्धतीने रक्षाबंधन साजरा करण्यात येत असते. यावर्षी लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर महिलांना रक्षाबंधन सण साजरा न करता आल्याने सखी ग्रुपच्या महिला सदस्यांनी परिसरात वृक्षारोपण केलेल्या वृक्षांचे संवर्धन व्हावे यासाठी वृक्षांना राखी बांधून रक्षाबंधन साजरी करण्यात आली. यावेळी परिसरातील व ग्रुपमधील महिला मोठ्या प्रमाणावर सहभागी झाले होत्या. भविष्यात पर्यावरण संतुलन राखण्यात वृक्षांचा गरज भासणार आहे. म्हणून आम्ही वृक्षांना राखी बांधून हा उपक्रम साजरा केल्याची माहिती ग्रुपच्या अध्यक्षा संगीता पाटील यांनी सांगितले.