महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नवापूर एसटी आगारातील चालकाचा आत्महत्येचा प्रयत्न - Navapur bus depot Driver attempted suicide

दाभाडे यांनी आत्महत्येचा प्रयत्न केल्यानंतर परिवहन मंडळाच्या नवापूर आगारात एकच खळबळ माजली आहे. ही घटना काल रात्री उशिरा घडल्याने आत्महत्या करण्याचा प्रयत्न कशामुळे केला याचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही.

नवापूर आगार

By

Published : Sep 15, 2019, 12:25 PM IST

नंदुरबार- महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाच्या नवापूर आगारातील चालकाने मंडळाच्या कार्यालय परिसरात आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. विषारी औषध पिऊन त्याने आपले जीवन संपविण्याचे प्रयत्न केले. ही घटना शनिवारी रात्री उशिरा घडली. राजेंद्र रायसिंग दाभाडे असे आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या चालकाचे नाव आहे.

नवापूर आगारातील चालकाने केला आत्महत्येचा प्रयत्न

दाभाडे यांनी आत्महत्येचा प्रयत्न केल्यानंतर परिवहन मंडळाच्या नवापूर आगारात एकच खळबळ माजली आहे. आत्महत्येच्या प्रयत्नाचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. दरम्यान, दाभाडे यांच्यावर नंदुरबार जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. याप्रकरणी नवापूर पोलिसात नोंद करण्यात आली असून पोलिसांकडून अधिक तपास केल्या जात आहे. मात्र, परिवहन मंडळाच्या कार्यालयाच्या परिसरात चालकाने आत्महत्येचा प्रयत्न केल्याने विविध चर्चांना ऊत आले आहे.

हेही वाचा-जिल्ह्यातील आरोग्य संदर्भातील प्रश्नांवर मेहनत घेण्याची गरज - अमिताभ कांत

ABOUT THE AUTHOR

...view details