महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नंदुरबार पालिकेच्या 121 कोटी 86 लाखाचा अर्थसंकल्प नगराध्यक्षांनी केला सादर - Nandurbar Nandurbar Municipality budget

नंदुरबार पालिकेच्या121 कोटी86 लाखाच्या अर्तसंकल्पाला पालिकेच्या सभेत मंजूरी देण्यात आली. या अर्थसंकल्पात कुठलीही करवाढ करण्यात आलेली नाही आहे.

budget of 121 crore 86 lakhs of Nandurbar Municipality was presented by the Mayor
नंदुरबार पालिकेच्या 121 कोटी 86 लाखाचा अर्थसंकल्प नगराध्यक्षांनी केला सादर

By

Published : Feb 26, 2021, 7:46 PM IST

Updated : Feb 26, 2021, 8:42 PM IST

नंदुरबार - कुठलीही करवाढ न करता नंदुरबार पालिकेच्या 121 कोटी 86 लाख 86 हजार 686 रुपयांच्या अर्थसंकल्पाला मंजुरी देण्यात आली. विशेष म्हणजे कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी नंदुरबार पालिकेने 1 कोटीची तरतुद केली आहे. दरम्यान अर्थसंकल्पीय सभेत विरोधी पक्षनेते चारुदत्त कळवणकर यांनी घरपट्टी गौरव्यवहार झाल्याचा आरोप केला होता.

नंदुरबार पालिकेच्या 121 कोटी 86 लाखाचा अर्थसंकल्प नगराध्यक्षांनी केला सादर

कुठलीही दरवाढ नाही -

नंदुरबार पालिकेची अर्थसंकल्पीय सभा अटलबिहारी वाजपेयी सभागृहात नगराध्यक्षा रत्ना चंद्रकांत रघुवंशी, उपनगराध्यक्ष रविंद्र पवार, मुख्याधिकारी राजेंद्र शिंदे यांच्या उपस्थितीत पार पडली. नंदुरबार पालिकेच्या 121 कोटी 86 लाख 86 हजार 686 रुपयांचा अर्थसंकल्पाला यावेळी सभागृहाने मंजुरी दिली. नंदुरबार शहराला कोरोनाच्या प्रादुर्भावातुन बाहेर काढण्यासाठी 1 कोटी रुपयांची तरतुद करण्यात आली आहे.

घरपट्टीच्या मुद्द्यावरूनविरोधक आक्रमक -

पालिका सभेच्या अजेंड्यावर 13 विषय मांडण्यात आले होते. यावेळी सत्ताधारी व विरोधी नगरसेवकांमध्ये शाब्दीक चकमक सुरु होती. नगराध्यक्षा रत्ना रघुवंशी अर्थसंकल्प सादर करत असतांना पालिकेचे विरोधी नगरसेवक चारुदत्त कळवणकर यांनी घरपट्टीचा मुद्दा उपस्थित केला. पालिकेच्या मालकीच्या इमारतींवरील 25 ते 26 कोटींचा कर बेकायदेशीररित्या सत्ताधार्‍यांनी माफ केल्याचा आरोप विरोधी पक्षनेते चारुदत्त कळवणकर यांनी केला.

अर्थसंकल्पात नागरिकांसाठी विविध तरतुदी उपलब्ध -

अर्थसंकल्पीय सभेत सुवर्ण जयंती अंतर्गत दारिद्रय रेषेखालील नागरिकांसाठी कोविड लस मोफत देण्यासाठी 1 कोटी, मोहल्ला क्लिनीक योजना राबविण्यासाठी 5 लाख, डायलेसीस सेंटर व पॅथॉलॉजी लॅबसाठी 10 लाख, नवीन अग्निशमन वाहन खरेदी करण्यासाठी 1 कोटी, वृक्षारोपण व वनसंवर्धानासाठी 15 लाख, सांस्कृतीक कार्यक्रमासाठी 4 लाख, रोग प्रतिबंधक जंतुनाशके खरेदी करण्यासाठी 20 लाख महिला व बालविकास 40 लाख, वाचनालय व इ लायबरी 5 लाख, चौक सुशोभीकरण करण्यासाठी 30 लाख, पशुगणना जनगणना 10 लाख, नगरपालिका कर्मचारी पगार पेन्शन 23 कोटी, प्रशासकीय कामकाज 4.50 कोटी, नविन प्रशासकीय इमारत बांधणे 15 कोटी, बायोगॅस प्रकल्पासाठी 1 कोटी, क्रीडा व युवक कल्याण कामी 10 लाख, दैनंदिन पाणीपुरवठा जलशुध्दीकरण योजनेसाठी 3 कोटी, विद्युत विभाग विकासात्मक व इतर कामांसाठी 2 कोटी, डांबरी रस्ते, खडी रस्ते, सिमेन्ट रस्ते बांधण्यासाठी 6 कोटी, शासकीय अनुदान अंशदान मधुन विकास कामांसाठी 47 कोटी मंजुरी देण्यात आली आहे. मालमत्ता 2020-21 या चालु आर्थिक वर्षात एक रक्कमी संपूर्ण मालमत्ता कर भरणार्‍या मालमत्ताधारकांना 10 टक्के सुट देण्याला मुदतवाढ देणे, नंदुरबार शहराच्या मंजुर विकास योजनेतील स.नं.353/1 समाविष्ट असलेले क्षेत्र शेती विभागातुन वगळुन रहिवास विभागात समाविष्ट करण्याबाबत मंजुरी देण्यात आली.

कुठलीही करवाढ न करता अर्थसंकल्पातनागरी सुविधांना प्राधान्य - नगराध्यक्षा रघुवंशी

नंदुरबार नगरपालिकेने कुठलीही करवाढ न करता 121 कोटी 86 लाखाच्या अर्थसंकल्पाला मंजुरी दिली आहे. शुध्द पाणीपुरवठा, उच्च दर्जाचे रस्ते, निरोगी शहर, हरीत उद्याने, भव्यदिव्य प्रशासकीय इमारत, अपारंपारिक ऊर्जा अशा सर्व बाबींना अग्रस्थानी ठेवुन नंदनगरीतील नागरिकांना सुविधा पुरविण्याच्या उद्देशाने अर्थसंकल्प मंजुर करण्यात आला आहे. कोरोनामुळे नंदुरबार शहर बिकट अवस्थेतुन जात असतांना अशावेळी कोणतीही करवाढ करणे उचित होणार नाही. म्हणून कोणताही करवाढ न करता अर्थसंकल्प सादर करण्यात आला आहे. नंदुरबार नगरपालिका करत असलेल्या वॉटर ऑडीट व एनर्जी ऑडीटमुळे भविष्यात पाणीपट्टीत वाढ करावी लागणार असल्याचे सांगत राज्यात सर्वात कमी पाणीपट्टी असलेली नंदुरबार नगरपालिका असल्याचे नगराध्यक्षा सौ.रत्ना रघुवंशी यांनी सांगितले. अर्थसंकल्पातील सर्व तरतुदी वर्षभरात पूर्ण करण्यात येतील, असा विश्‍वास नगराध्यक्षा सौ.रघुवंशी यांनी व्यक्त केला.

Last Updated : Feb 26, 2021, 8:42 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details