महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्क आणि समविचारी समतावादी संघटनांचे जिल्हाधिकारी कार्यालयांवर धरणे आंदोलन - प्राचीन बौद्ध लेण्या नंदुरबार

बुलडाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यातील पूर्णा नदी काठावरील भोन गावात प्राचीन असा बुद्ध स्तूप उत्खननात सापडला आहे. मात्र, राज्य सरकार धरणाच्या नावाखाली या लेण्या पाण्यात बुडवण्याचा घाट घातला आहे.

बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्क आणि समविचारी समतावादी संघटनांचे जिल्हाधिकारी कार्यालयांवर धरणे आंदोलन

By

Published : Sep 15, 2019, 7:59 PM IST

नंदुरबार - राज्य सरकारने विकासाच्या आणि धरणांच्या नावाखाली प्राचीन बौद्ध लेण्या बुडवण्याचा घाट घातला असल्याचा आरोप बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्कच्या वतीने करण्यात आला आहे. याचाच निषेध म्हणून बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्क आणि समविचारी समतावादी संघटना यांच्या वतीने शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर धरणे आंदोलन करण्यात आले.

बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्क आणि समविचारी समतावादी संघटनांचे जिल्हाधिकारी कार्यालयांवर धरणे आंदोलन

हे ही वाचा -होर्डिंग लावून तिकीट मिळत नाही, काम पाहूनच तिकीट देणार - मुख्यमंत्री

बुलडाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यातील पूर्णा नदी काठावरील भोन गावात प्राचीन असा बौद्ध स्तूप उत्खननात सापडला आहे.हा ऐतिहासीक ठेवा जतन करण्याचे काम हे सरकारचे काम आहे. भारताची ओळख ही बुध्दाचा देश अशी आहे पण ही ओळख पुसण्याचा प्रयत्न होत आहे. याच्याच निषेधार्थ नंदुरबार जिल्हाधिकारी कार्यालयात बुद्धिस्ट इंटरनेशनल च्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते उपस्थित कार्यकर्त्यांनी राज्य सरकारच्या धोरणाचा यावेळी निषेध केला.

हे ही वाचा -ज्यांच्या गाडीवर कायम लाल दिवा राहिला ते स्वार्थासाठी दुसऱ्या पक्षात, जयंत पाटलांचा नाईकांना टोला

ABOUT THE AUTHOR

...view details