नंदुरबार -जिल्ह्यातील धडगाव आणि अक्कलकुवा तालुक्यात बीएसएनएलची सेवा वारंवार कोलमडत असल्याने ग्राहकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. दोन महिन्यांपासून या विभागातील वीज वितरण कंपनीचे साधारण साडेचार लाख रुपयाचे वीजबिल थकीत आहे. त्यामुळे टेलिफोन सेवा खंडित आहे.
दूरसंचार विभाग आणि महावितरण कंपनी यांच्यात झालेल्या चर्चेनंतर थकीत रक्कम जमा करण्यास मुदतवाढ देण्यात आली होती. मात्र, बीएसएनएलने दिलेल्या मुदतीत वीज बिल न भरल्याने सातपुड्याच्या दुर्गम भागातील आठ मोबाईल टॉवरची विजजोडणी खंडित करण्यात आली आहे. यामुळे या भागातील सुमारे 60 हजार ग्राहक प्रभावित झाले आहेत.