महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नंदुरबारमध्ये विविध मागण्यांसाठी बीएसएनएल कर्मचारी तीन दिवसीय संपावर

२०१७ पासून तिसरे संशोधित वेतन लागू करणे, सरकारी नियमानुसार पेन्शन घ्यावे, जमीन व्यवस्थापन धोरणाला त्वरित मंजुरी द्यावी यासह अन्य मागण्यांसाठी हे कर्मचारी संप करत आहेत.

नंदुरबारमध्ये विविध मागण्यांसाठी बीएसएनएल कर्मचारी तीन दिवसीय संपावर

By

Published : Feb 18, 2019, 8:49 PM IST


नंदुरबार - वेतन वाढीसह अन्य मागण्यांसाठी भारत संचार निगम लिमिटेडच्या कर्मचार्‍यांनी ३ दिवसीय संप पुकारला आहे. या संपात नंदुरबार आणि धुळे जिल्ह्यातील सुमारे ४२५ कर्मचारी सहभागी झाले आहेत.


नंदुरबारमध्ये विविध मागण्यांसाठी बीएसएनएल कर्मचारी तीन दिवसीय संपावर
२०१७ पासून तिसरे संशोधित वेतन लागू करणे, सरकारी नियमानुसार पेन्शन घ्यावे, जमीन व्यवस्थापन धोरणाला त्वरित मंजुरी द्यावी यासह अन्य मागण्यांसाठी हे कर्मचारी संप करत आहेत. जिल्ह्यातील अतिदुर्गम भाग असलेल्या अक्कलकुवा आणि धडगाव या तालुक्यात एकमेव बी. एस. एन. एल. कंपनीने मोबाईल सेवा पुरवलेली आहे. मात्र, या भागात कंपनीच्या प्रपोजलनुसार ४ जी सेवा सुरू व्हावी, अशी मागणी येथील नागरिकांची आहे. बी.एस.एन.एल. कर्मचाऱ्यांची देखील ही लावून मागणी आहे.

For All Latest Updates

ABOUT THE AUTHOR

...view details