Bridge Collapsed : रंका नदीवरील पूल कोसळला ; महाराष्ट्र गुजरात सीमेलगत अनेक गावांचा संपर्क तुटला - bridge over Ranka river
नंदुरबार जिल्ह्यातून जाणाऱ्या राज्यमार्ग सहावरील धानोरा गावाजवळ असलेल्या रंका नदीवरील बांधण्यात आलेला पुल (bridge over Ranka river) कोसळला. सकाळी नऊ वाजण्याचा सुमारास अचानक हा पूल कोसळला, मात्र पुलावर वाहने नसल्याने मोठी दुर्घटना घटना टळली (bridge collapsed near Dhanora village) आहे.

नंदुरबार :नंदुरबार जिल्ह्यातून जाणाऱ्या राज्यमार्ग सहावरील धानोरा गावाजवळ असलेल्या रंका नदीवरील बांधण्यात आलेला पुल (bridge over Ranka river) कोसळला. सकाळी नऊ वाजण्याचा सुमारास अचानक हा पूल कोसळला, मात्र पुलावर वाहने नसल्याने मोठी दुर्घटना घटना टळली (bridge collapsed near Dhanora village) आहे. मात्र 40-45 वर्ष जुन्या पुलाचे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने स्ट्रक्चर ऑडिट करण्यात आले होते का ? जिल्ह्यातील राज्य मार्गावर असलेल्या धोकेदायक पुलाचे स्ट्रक्चर ऑडिट होते का ? असे प्रश्न आता उपस्थित केले जात आहेत. गुजरातला जोडणारा महत्वपूर्ण मार्ग असल्याने या मार्गावरील वाहतूक दुसऱ्या मार्गाने वळविण्यात आली (bridge collapsed near State Highway 6) आहे.