महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नंदुरबार तालुक्यातील प्रत्येक विद्यार्थ्याला शाळेच्या पहिल्याच दिवशी मिळणार पाठ्यपुस्तके - nandurbar school news

सर्व शिक्षा अभियानांतर्गत इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तक वितरीत केली जातात. नंदुरबार तालुक्यात शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना पुस्तके प्राप्त होतील, अशी माहिती उपशिक्षणाधिकारी डॉ. राहुल चौधरी यांनी दिली.

file photo
संग्रहीत छायाचित्र

By

Published : Jun 9, 2020, 10:08 AM IST

नंदुरबार- तालुक्यात 60 टक्केपेक्षा अधीक पुस्तकांचा पुरवठा झाला असून शाळा सुरु होण्यापूर्वी सर्व शाळांमध्ये ते पोहचविली जाणार आहेत. पहिली ते आठवीपर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्या दिवशीच पुस्तके देण्यात येतील, अशी माहिती उपशिक्षणाधिकारी डॉ. राहुल चौधरी यांनी दिली. सर्व शिक्षा अभियानाअंतर्गत इयत्ता पहिली ते आठवीच्या सर्व विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके पुरविली जातात. या योजनेचा लाभ विद्यार्थ्यांना शाळा सुरू होण्यापूर्वी देण्यासाठी नंदुरबार तालुका शिक्षण विभागाने तयारी पुर्ण केली आहे.

माहिती देताना उपशिक्षणाधिकारी डॉ. राहुल चौधरी

नंदुरबार तालुक्यात पहिली ते आठवीचे एकूण 50 हजार 955 विद्यार्थी आहेत. त्यांना 2 लाख 91 हजार 874 एवढी पाठ्यपुस्तके वाटप करण्यात येणार आहेत. त्यापैकी जूनच्या पहिल्या आठवडा अखेर 1 लाख 57 हजार 373 पाठ्यपुस्तके प्राप्त झाली आहेत. उर्वरित पाठ्यपुस्तके येत्या दोन दिवसात प्राप्त होणार आहेत. सर्व पुस्तके शाळा सुरू होण्यापूर्वी संबधीत शाळांवर पोहोचणार आहेत. त्यासाठीचे नियोजन पूर्ण करण्यात आले आहे. शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांच्या हाती पुस्तके प्राप्त होतील यासाठी तालुका शिक्षण विभाग सज्ज असल्याची माहिती उपशिक्षणाधिकारी डॉ.राहुल चौधरी यांनी दिली.

यासाठी शिक्षण विस्तार अधिकारी सचिन गोसावी, केंद्र प्रमुख वाघ, बोरसे, गटसाधन केंद्र कर्मचारी चौरे, बेडसे, पाटील हे परिश्रम घेत आहेत.

हेही वाचा -कोरोना योद्धा असलेल्या बंधपत्रित आरोग्य सेविकांचे नंदुरबारमध्ये कामबंद आंदोलन

ABOUT THE AUTHOR

...view details