नंदुरबार- जिल्हा परिषद आणि सहा पंचायत समितीच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापायला सुरुवात झाली आहे. सर्वच राजकीय पक्ष कामाला लागले आहेत. या निवडणुकीमध्ये भाजप स्वबळावर निवडणूक लढवणार असून त्यासाठी उमेदवारांची चाचपणीही चालू आहे.
भाजपतर्फे नंदुरबार जिल्हा परिषद निवडणुकीसाठी उमेदवारांची चाचपणी - भाजप नंदुरबार जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक
भाजपच्यावतीने इच्छुक उमेदवारांची मुलाखती घेण्यात आल्या आहेत. या मुलाखतींना मोठ्या प्रमाणात भाजपचे कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी उमेदवारांनी मुलाखती दिल्या आहेत.
हेही वाचा -सत्ता नाट्यानंतर मनसेची आज महत्त्वाची बैठक, राज ठाकरे करणार मार्गदर्शन
भाजपच्यावतीने इच्छुक उमेदवारांची मुलाखती घेण्यात आल्या आहेत. या मुलाखतींना मोठ्या प्रमाणात भाजपचे कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी उमेदवारांनी मुलाखती दिल्या आहेत. यावेळी भाजप नेते आमदार डॉ. विजयकुमार गावित, शहादा मतदारसंघाचे आमदार राजेश पाडवी, जिल्हाध्यक्ष विजय चौधरी यांच्यासह भाजपचे नेते उपस्थित होते.
आतापर्यंत सोबत असलेला शिवसेना पक्ष आता आपल्याविरोधात निवडणूक लढवत असल्यामुळे आपण सर्वांनी सावधतेने ही निवडणूक लढवायची आहे, असे मत यावेळी भाजप नेत्यांनी मांडले.