नंदुरबार -आज राज्य सरकारने पूरग्रस्तांसाठी साडे अकरा कोटींचे पॅकेज जाहीर केले. यावरून आता भाजपानेते आशिष शेलार यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे. पॅकेज नाही, तर मदत देणार, अशी वल्गना करणारे मुख्यमंत्री स्वतःच्या शब्दावरून फिरले. आधीचीच मदत मिळाली नाही, तर नवीन मदतीची अपेक्षा नुकसानग्रस्तांनी ठेवावी, असे भाजपाचे आमदार अशिष शेलार यांनी म्हटले. तसेच महाविकास आघाडीची स्थिती 'खायला काळ भुईला भार' असल्याचेही ते म्हणाले.
मुख्यमंत्री स्वतःच्या शब्दावरून फिरले -
मुख्यमंत्री स्वत म्हणाले होते की, मी पॅकेज नाही, तर मदत देणारा मुख्यमंत्री आहे. त्यामुळे मुख्यमंत्री स्वतच्या शब्दावरून फिरले असल्याचा आरोप शेलार यांनी केला. या अगोदर तोक्ते आणि निसर्ग वादळात दिलेली मदत जनतेपर्यंत पोहोचलेली नाही. अशा परिस्थितीत ठाकरे सरकाच्या पॅकेजवर जनता विश्वास ठेवेल का, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.
शिवसेनेचे आंदोलन हे टक्केवारीच-