नंदुरबार -देशातील सहा राज्यात बर्ड फ्लूचा धोका वाढला आहे. महाराष्ट्रात धोका नसला तरी खबरदारी घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत. नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यात मोठ्या प्रमाणात पोल्ट्री फॉर्म असल्याने काळजी घेण्याचे आदेश प्रशासनाच्या वतीने देण्यात आले असून पोल्ट्री मालक विशेष काळजी घेत आहेत.
जिल्ह्यातील पोल्ट्री फार्म चालकांकडून योग्य ती खबरदारी
देशातील सहा राज्यात बर्ड फ्लूचा आजार आल्याने राज्यात कुठेही बर्ड फ्लूची लक्षणे आढळून आले नसले तरी जिल्ह्यातील पोल्ट्री चालकाकडून विशेष काळजी घेतली जात आहे. यात पक्ष्यांच्या आरोग्याची काळजी घेतली जात आहे. अचानक पक्ष्यांचा मोठ्या प्रमाणात मृत्यू झाला तर जिल्हा प्रशासनाला कळवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. प्रशासनाच्या आणि पोल्ट्री व्यवसायिकांच्या वतीने योग्य ती खबरदारी घेतली जात आहे.
बर्ड फ्ल्यूच्या भीतीने चिकन व अंडी विक्रीवर परिणाम वेळोवेळी उपाययोजना 2006 मध्ये नवापूर तालुक्यातील पहिल्यांदा मोठ्या प्रमाणात बर्ड फ्लू झाला होता. संपूर्ण कुक्कूटपालन व्यवसाय ठप्प झाला होता अनेक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. त्यानंतर नवापूर तालुक्यात बर्ड फ्लूचा शिरकाव झाला नाही. पोल्ट्री व्यवसायिकांनी घाबरून न जाता खबरदारी म्हणून पक्षांचे वेळोवेळी लसीकरण व देखभाल करणे गरजेचे आहे, असे मत पशुवैद्यकीय तज्ञांनी व्यक्त केले आहे.
पोल्ट्री व्यवसायावर व्यवसायावर परिणाम