महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

तोरणमाळमध्ये 'भोंगऱ्या' बाजारातून आदिवासी संस्कृतीचे दर्शन - नंदुरबारमध्ये होळी

या उत्सवात सहभागी झालेले समाजबांधव लोकगीत गायन, बासरी वादन व ढोल वादनाचे विविध प्रकार व नृत्याविष्कार सादर करत आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडवतात. या बाजारात आदिवासी बांधव पारंपारिक वेशभूषा करून आणि ढोल घेऊन सहभागी झाले होते.

Nandurbar
भोंगऱ्या बाजार

By

Published : Mar 7, 2020, 5:41 PM IST

नंदुरबार- सातपुड्याच्या दुर्गम भागातील तोरणमाळ येथे भोंगर्‍या बाजाराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी हजारो आदिवासी बांधव या बाजारात सहभागी झाले होते. आदिवासी समाजात होळीला खूप महत्व आहे आणि होळीच्या अगोदर मोठ्या बाजारपेठेच्या गावांमध्ये भोंगऱ्या बाजाराचे आयोजन करण्यात येते.

तोरणमाळमध्ये 'भोंगऱ्या' बाजारातून आदिवासी संस्कृतीचे दर्शन

हेही वाचा -अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या जिल्हा समन्वयकाला लाच घेताना रंगेहात अटक

या उत्सवात सहभागी झालेले समाजबांधव लोकगीत गायन, बासरी वादन व ढोल वादनाचे विविध प्रकार व नृत्याविष्कार सादर करत आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडवतात. या बाजारात आदिवासी बांधव पारंपारिक वेशभूषा करून आणि ढोल घेऊन सहभागी झाले होते.

त्याबरोबरच गावातील पोलीस पाटील आणि पंचमंडळी यांच्या उपस्थितीत शोभायात्राही काढण्यात आली. पारंपारिक ढोल आणि संगिताच्या तालावर आदिवासींनी यावेळी नृत्य सादर केले. भोंगर्‍या बाजार हा होळी सणाची सुरुवात असते. भोंगऱ्या बाजारात आदिवासी बांधव होळीसाठी लागणारे साहित्य खरेदी करतात.

हेही वाचा -नंदुरबारमध्ये अवकाळी पाऊस; शेतकरी, व्यापार्‍यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याची शक्यता

ABOUT THE AUTHOR

...view details