नंदुरबार - एका लग्न समारंभात नवरीच्या मेकअपसाठी आलेली ब्युटीशियन कोरोना पॉझिटिव्ह निघाल्याची घटना उघडकीस आली आहे. यानतंर तिच्या संपर्कात आलेल्या वधु-वरांसह 29 जणांना क्वॉरंटाईन करण्यात आले आहे.
चोपडा तालुक्यातील अडावद येथील वधु लग्नासाठी नवापूर तालुक्यातील विसरवाडी येथे आली होती. यावेळी 20 वर्हाडींसह नवरीच्या मेकअपसाठी ब्युटीशियन आली होती. 25 जूनला ती नवरीबरोबर राहिली. मात्र, काही दिवसांपूर्वीच भुसावळ येथील एका लग्नातील नवरदेव कोरोना पॉझिटीव्ह आढळला होता. त्याच्या संपर्कात ही ब्युटीशियन आली होती. यामुळे तिला क्वॉरंटाईन करुन नमुने तपासणीसाठी पाठविले असता 30 जूनला तिचा अहवाल पॉझिटिव्ह आला.