महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

वीज बिल वसुलीसाठी आलेल्या महावितरणच्या कर्मचाऱ्यांना नगरसेवकाकडून जबर मारहाण - नगरसेवकासह दोघांवर गुन्हा दाखल

शहादा शहरातील महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीचे कर्मचारी थकित वीज बिल वसुलीसाठी खेतिया रोडवरील भारत डेअरीवर गेले असता त्यांना नगरसेवक व इतर दोघांकडून बेदम शिवीगाळ करीत मारहाण करण्यात आली. नगरसेवकासह दोघांविरोधात शहादा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कर्मचाऱ्यांचे वीज वितरण कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
कर्मचाऱ्यांचे वीज वितरण कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन

By

Published : Jun 26, 2021, 7:44 PM IST

नंदुरबार -शहादा शहरातील महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीचे कर्मचारी थकित वीज बिल वसुलीसाठी खेतिया रोडवरील भारत डेअरीवर गेले असता त्यांना नगरसेवक व इतर दोघांकडून बेदम शिवीगाळ करीत मारहाण करण्यात आली. नगरसेवकासह दोघांविरोधात शहादा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

थकित वीज बिल वसुलीसाठी आलेल्या महावितरणच्या कर्मचाऱ्यांना नगरसेवकाकडून जबर मारहाण

विद्युत कनेक्शन कट केल्याच्या रागातून मारहाण
शहादा शहरातील गरीब नवाज काॅलनीतील भारत डेअरी येथे चार महिन्याचे कमर्शियल वीज बिल वसुलीसाठी महाराष्ट्र राज्य वितरण कंपनीचे कर्मचारी गेले असता विज बिल भरण्यास टाळाटाळ करण्यात आली. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी अखेर डेअरीचे वीज कनेक्शन कट केले. त्याचा राग आल्यामुळे मी वीज बिल भरण्यास तयार आहे व डेअरीवर येऊन त्वरित वीज कनेक्शन जोडणी करा, अन्यथा डेअरीतील पदार्थ खराब होतील, असे सांगून कर्मचाऱ्यांना बोलावून नगरसेवक वाहिद रशिद पिंजारी, मन्नू रशिद पिंजारी आणि वसीम अख्तर शेख तेली यांनी वीज वितरण कंपनीच्या गणेश साळी व सुनिल ठाकरे या कर्मचाऱ्यांना बेदम मारहाण केली.

कर्मचाऱ्यांचे वीज वितरण कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
संतप्त झालेल्या महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी महावितरण कार्यालयासमोर एकत्रित होत घोषणाबाजी करत मारहाणीचा निषेध केला व वरिष्ठांसमोर होणाऱ्या त्रासाचा पाढा वाचला. जर जबाबदार व्यक्तीच शासकीय कर्मचाऱ्यांवर हल्ले चढवत असतील, तर वीज वितरण कंपनीने केवळ गोरगरिबांचे कनेक्शन कट करावे का? राजकीय दबावाखाली महावितरणने पैसे वसुली करूच नये का? असे अनेक प्रश्‍न त्यांनी उपस्थित केले. यावेळी अतिरिक्त कार्यकारी अभियंता आर. एन. सोनाट, कार्यकारी अभियंता संदेश ठवरे, उपकार्यकारी अभियंता भुषण जगताप, सहायक अभियंता सुजित पाटील, तिरूपती पाटील, विजय लांडगे ,मनीष पवार, गुलाब सोनवणे, तुषार ठाकूर आदी उपस्थित होते.

नगरसेवकासह दोघांवर गुन्हा दाखल
महावितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी नगरसेवक व इतर दोघांविरुद्ध शहादा पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल केला. तसेच महावितरण कंपनीच्या कृतीसमितीने एकत्रित येत कर्मचाऱ्यांवर हल्ला करणाऱ्या नगरसेवकास व इतर दोघांना अटक झाली पाहीजे, अशी मागणी केली. महावितरण कार्यालयासमोर घोषणाबाजी करत घडलेल्या घटनेचा निषेध व्यक्त केला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक दीपक बुधवंत यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक विक्रांत कचरे करीत आहे.

हेही वाचा -Taj Hotel : 'ताज'मध्ये बॉम्ब ठेवल्याचा कॉल लहान मुलाने केल्याचे उघड; कराडमधील मुलाची चौकशी सुरू

ABOUT THE AUTHOR

...view details