नंदुरबार :बऱ्हाणपूर-अंकलेश्वर महामार्गाची दुरवस्था झाली आहे. महामार्ग प्रशासन आणि सार्वजनिक बांधकाम विभाग या महामार्गाची दुरुस्ती करत नसल्याने मोठे खड्डे पडले आहेत. महामार्गावरील पुलांची ही दुरवस्था झाले आहे. वेळोवेळी संघटनांकडून लेखी व तोंडी स्वरूपात सार्वजनिक बांधकाम विभाग व महामार्ग प्रशासनाला दिले असून तरीसुद्धा कुठलीही कारवाई होत नाही. दुरुस्त न झाल्यास महामार्ग बंद करण्याचा इशारा सामाजिक कार्यकर्त्यांनी दिला आहे.
बऱ्हाणपूर-अंकलेश्वर महामार्गाची दुरवस्था हेही वाचा - गोंदिया रेल्वे पोलिसांनी पकडले २ कोटी ९५ लाख रुपयांचे सोन्याचे दागिने
अक्कलकुवा तालुक्यातील विविध राजकीय आणि सामाजिक संघटनांनी या रस्त्याची दुरुस्ती व्हावी म्हणून निवेदने दिली होती. मात्र, प्रशासनाकडून त्याची दखल घेतली जात नसल्याने आता राजकीय पक्ष आणि सामाजिक संघटना आक्रमक झाल्या आहेत. महामार्ग प्रशासनाने 20 नोव्हेंबर पर्यंत या रस्त्याची दुरुस्ती केली नाही तर मार्ग वाहतुकीसाठी बंद पाडण्याचा इशारा आंदोलकांनी दिला आहे. महामार्गावर पडलेल्या मोठमोठ्या खड्ड्यांमुळे दररोज अपघात होत असून याला प्रशासन जबाबदार असल्याचे आंदोलक म्हणतात आहेत. महामार्ग प्रशासनाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी त्यांनी केली आहे. मार्ग बंद झाल्यास गुजरात मध्ये जाणाऱ्या प्रवाशांचे मोठे हाल होणार असल्याने प्रशासनाने आंदोलनापूर्वी दुरुस्ती करावी अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
हेही वाचा - रायगडमधील क्रीपझो कंपनीत बॉयलरचा स्फोट, १८ जण जखमी