नंदुरबार - दीपावली पाडवा व बलिप्रतिपदा निमित्त दरवर्षी नंदुरबार येथे 'सगर' पूजन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत असते. सगर पूजनाच्या दिवशी यमराजाचे वाहन असलेल्या रेड्याला पाण्याने धुऊन त्याला रंग लावून वाजत-गाजत संपूर्ण शहरातून मिरवणूक काढली जाते. शहरातील सोनी विहीर परिसरात समाजातील मानकऱ्यांच्या हस्ते रेड्यांची सगर पूजन केले जाते.
बलिप्रतिपदा : गवळी समाजातर्फे शेकडो वर्षापासून 'सगर' उत्सवाची परंपरा कायम शेकडो वर्षांची परंपरा कायम -
संगणक आणि इंटरनेटच्या युगातही गवळी समाजात शेकडो वर्षापासून 'सगर' उत्सव पशुधनाची परंपरा आजही कायम आहे. म्हणून दरवर्षी दीपावली पाडवा व बलिप्रतिपदा निमित्त मुक्या प्राण्यांचा 'सगर' उत्सव नंदनगरीचे आकर्षण असते. सलग दुसऱ्यावर्षी कोरोना संकटामुळे यंदाही सगर उत्सव साध्या पद्धतीने साजरा करण्याचा निर्णय गवळी समाज पंच मंडळाने घेतला आहे.
दीपावली पाडवा व बलिप्रतिपदा निमित्त 'सगर' पुजन -
प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही दीपावली पाडवा बलिप्रतिपदा निमित्त गवळी समाजातर्फे सगर उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. महाभारत काळात भगवान श्रीकृष्णांनी गोवर्धन पर्वत उचलून गवळी समाजाच्या पशुधनाचे संरक्षण केले होते. तेव्हापासून सगर उत्सवास प्रारंभ झाल्याचे जुने जाणकार सांगतात. पारंपारिक दुग्धव्यवसाय यानिमित्त गवळी समाज बांधव दिपावली सणानिमित्त आनंदोत्सवात सहभागी होतात. आगामी काळात आणि नववर्षात राज्यासह देशात आणि समाजात कुठलेही अघटित संकट येऊ नये म्हणून गाई-म्हशी लक्ष्मीचे स्वरूप आणि यमराजाचे वाहन रेडा यांचे पाडव्यानिमित्त पूजन करण्यात येते. वीरशैव लिंगायत गवळी समाज म्हैस व रेडाच्या माध्यमातून बंधुभाव जोपासण्यासाठी शेकडो वर्षापासून ही परंपरा आजही कायम आहे. प्रथा व परंपरेनुसार अनेक वर्षापासून शहरातील ऐतिहासिक मोठा मारुती मंदिराजवळील सोनी विहीर चौकात सगर पूजन करण्यात येते. त्यानंतर नंदुरबार शहरातील गवळीवाडा, बालवीर चौक, देसाईपुरा परिसरातून गाई म्हशी आणि रेड्यांची वाजत गाजत मिरवणूक काढण्यात येते. याठिकाणी गवळी समाजाचे मानकरी उपस्थित राहून आलेल्या गाई-म्हशींसह मालकांना "शिवशरणार्थ" संबोधून स्वागत करतात.
रेड्यांची झुंज परंपरा खंडित -
सगर पूजा निमित्त नंदुरबार शहराबाहेरील काशिनाथ बाबा मंदिर परिसरात रेड्यांची झुंज लावली जात होती. रेड्यांच्या झुंजीमध्ये रेड्याने मैदान सोडले तो परातीत घोषित केला जात होता व तो मैदानात असेल त्याला विजेते म्हणून सन्मानचिन्ह रोख रक्कम समाजाच्या वतीने बक्षीस म्हणून दिली जात होती. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रेड्यांची झुंज बंद करण्यात आली आहे.
हेही वाचा -ईटीव्ही विशेष : मध्य रेल्वे झाली ७० वर्षांची; 'असा' आहे मरेचा गौरवशाली इतिहास