महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

संततधार पावसामुळे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 बंद होण्याची शक्यता - महामार्ग

मागील 24 तासांपासून जिल्ह्यात पावसाची संततधार सुरू आहे. यामुळे महामार्गाची अवस्था अधिकच बिकट होत आहे. पुढील काही तास पाऊस असाच सुरू राहिला तर महामार्ग कायमचा बंद होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

वाहतूक कोंडी

By

Published : Aug 1, 2019, 2:29 PM IST

नंदुरबार -राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वर नवापूर ते कोंडाईबारी घाटा दरम्यान रस्त्याची अवस्था अत्यंत वाईट झाली आहे. यामुळे या रस्त्यावर अपघातांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. तसेच पुढील काही तास पाऊस असाच सुरू राहिला तर महामार्ग कायमचा बंद होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6
नवापूर, सारवट, विसरवाडी, चिंचपाडा, मासलीपाडा, बर्डीपाडा, सोंनखांब, मोरकरंजा या गावाजवळ मोठ्या प्रमाणात खड्डे निर्माण झाले आहेत. यामुळे चिखलात गाड्या फसून रस्त्यावर वाहतूक कोंडी होत आहे. यामुळे जवळपास पाच किलोमीटर अंतराच्या लांबच लांब रांगा या रस्तावर पाहायला मिळत आहेत. मात्र, केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री आणि संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांचे याकडे पूर्णत: दुर्लक्ष होत असल्याची तक्रार स्थानिक लोक करत आहेत.
चिखलात फसलेला ट्रक

मागील 24 तासांपासून जिल्ह्यात पावसाची संततधार सुरू आहे. यामुळे महामार्गाची अवस्था अधिकच बिकट होत आहे. पुढील काही तास पाऊस असाच सुरू राहिला तर महामार्ग कायमचा बंद होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details