नंदुरबार - तापी नदीवरील बॅरेज पाणीपातळी नियंत्रणासाठी सारंगखेडा व प्रकाशा बॅरेजचे 2 दरवाजे अर्धा मिटरने उघडण्यात आले आहे. सारंगखेडा बॅरेजमधून 3 हजार 197 आणि प्रकाशा बॅरेजमधून 3 हजार 560 क्युसेक पाण्याचा विसर्ग तापी नदीपात्रात सोडण्यात आला आहे. त्यामुळे प्रशासनासने नदीकाठावरील नागरिकांना सर्तकतेचा इशारा दिला आहे.
सारंगखेडा व प्रकाशा बॅरेजचे 2 दरवाजे उघडले; तापी नदीकाठच्या गावांना सर्तकतेचा इशारा सारंगखेडा व प्रकाश बॅरेजचे उघडले दोन दरवाजे
हातनूर धरणाचे आठ दरवाजे उघडण्यात आले आहेत. हातनुर धरणाच्या पाण्याचा विसर्ग तापी नदीद्वारे सारंखेडा व प्रकाशा बॅरेजमध्ये होतो. तापी नदीवरील बॅरेज पाणीपातळीच्या नियंत्रणासाठी सारंगखेडा व प्रकाशा बॅरेजचे 2 दरवाजे अर्धा मिटरने उघडण्यात आले असून सारंगखेडा बॅरेजमधून 3 हजार 197 आणि प्रकाशा बॅरेजमधून 3 हजार 560 क्युसेक पाण्याचा विसर्ग तापी नदीपात्रात सोडण्यात आला आहे.
नदीकाठावरील नागरिकांना सावधानतेचा इशारा
तापी नदीकाठावरील नागरिकांनी सावधाता बाळगावी. नागरीकांनी तापी नदीकाठाजवळ थांबू नये, नदीमधील पाण्याचे पंप सुरक्षित स्थळी हलवावे, असे निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुधीर खांदे यांनी नागरिकांना निर्देश दिले आहे.