नंदुरबार- शहरातील सर्वच एटीएममध्ये पैसे नसल्याने तसेच बँकांना सलग सुट्या असल्याने सर्वसामान्य नागरिकांचे मोठे हाल होत आहेत.
नंदुरबार शहरातील एटीएम बंद, नागरिकांचे हाल - नंदुरबार
नंदुरबार - शहरातील सर्वच एटीएम बंद असल्याने सर्वसामान्य नागरिकांचे मोठे हाल होत आहेत.
दिवाळीच्या पार्श्वभूमीवर नंदुरबार शहरात मोठ्या प्रमाणात रेल्वेने येणाऱ्या प्रवाशांची आणि नागरिकांची गर्दी दिसून येते. नंदुरबार हे रेल्वे जंक्शन असल्याने या ठिकाणी धुळे, नंदुरबार आणि गुजरात राज्यातील प्रवासी मोठ्या प्रमाणात येतात. त्याच्यासोबत शहरात दिवाळीच्या खरेदीसाठी येणाऱ्या नागरिकांची ही गर्दी मोठी असते. मात्र, ऐन दिवाळीत शहरातील सर्वच एटीएम बंद असल्याने सर्वसामान्य नागरिकांचे आणि ग्राहकांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत. बँक प्रशासनाने याची दखल घेऊन शहरातील एटीएम लवकरात लवकर सुरू करावी, अशी मागणी बँक ग्राहकांनी केली आहे.