महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

डाकीण संबोधल्या जाणाऱ्या 'त्या' महिलेला अंनिसच्या कार्यकर्त्यांनी दिला न्याय - नंदूरबार डाकीण बातमी

धडगाव तालुक्यातील मांडवीचा रुळमालपाडा येथील चाळीस वर्षीय महिला तंत्रमंत्राने जादुटोणा करीत आहे. त्यामुळे आपल्या कुटुंबाची हानी होत असल्याचा संशय येथील रामसिंग पटले व बिणाबाई पटले यांना दोन वर्षापासून होता. या संशयातून रामसिंग पटले व बिनाबाई पटले यांनी आपल्या शेजारी राहणाऱ्या एका महिलेला डाकीण ठरवले होते.

anis-activist-gives-justice-to-woman-who-suspects-black-magic
डाकीण असल्याचा संशय घेण्याऱ्या महिलेला अंनिसच्या कार्यकर्तांनी दिला न्याय

By

Published : Dec 14, 2019, 11:24 AM IST

Updated : Dec 14, 2019, 11:32 AM IST

नंदूरबार -येथील मांडवीचा रुळमालपाडामधली (ता. धडगाव) महिलेचा डाकीण असल्याच्या संशयावरून छळ होत असल्याच्या प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी महाराष्ट्र अंनिसच्या कार्यकर्त्या व शहादा उपविभागीय पोलीस अधिकारी पुंडलिक सपकाळे यांनी महिलेला न्याय मिळवून दिला. या महिलेच्या गावात जाऊन पीडित महिलेच्या मनातील डाकीण (काळी जादू करणारी महिला) असल्याचा संशय काढून समजूत घालण्यात आली.

डाकीण असल्याचा संशय घेण्याऱ्या महिलेला अंनिसच्या कार्यकर्तांनी दिला न्याय

हेही वाचा-नागरिकत्त्व दुरुस्ती विधेयक सर्व राज्यांना लागू करावेच लागणार; 'ही' आहे घटनात्मक तरतूद

धडगाव तालुक्यातील मांडवीचा रुळमालपाडा येथील चाळीस वर्षीय महिला तंत्रमंत्राने जादुटोणा करीत आहे. त्यामुळे आपल्या कुटुंबाची हानी होत असल्याचा संशय येथील रामसिंग पटले व बिणाबाई पटले यांना दोन वर्षापासून होता. या संशयातून रामसिंग पटले व बिनाबाई पटले यांनी आपल्या शेजारी राहणाऱ्या एका महिलेला डाकीण ठरवले होते. डाकीणीच्या गैरसमजामुळे पटले कुटुंबीय कुरापती काढून त्या महिलेशी वेळोवेळी भांडण करीत होते. याबाबत गावातील पंचांनी दोन्ही पक्षांना समज देऊन हा वाद मिटवण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, नोव्हेंबर महिन्यात रामसिंग पटले, दारासिंग भोग्या भिल हे अन्य सहकाऱ्यासह डाकीण शोधण्यासाठी मांत्रिकाकडे गेले. तेथून आल्यानंतर रामसिंग पटले व त्यांच्या पत्नी बिनाबाई पटले यांनी १३ नोव्हेंबर रोजी त्या महिलेला डाकीण ठरवून तू मंत्रतंत्र जादूटोणा करते, असे सांगून शिवीगाळ केली. तसेच 'तू जर इथून आपले घर हलवले नाही तर तुला व तुझ्या पतीला जीवे ठार मारू' अशी धमकी देखील दिली.

या प्रकारानंतर डाकीण ठरवण्यात आलेल्या महिलेने १६ नोव्हेंबर रोजी धडगाव पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. त्यांनतर पोलिसांनी मध्यस्थी करत त्या महिलेला त्रास देणाऱ्यांना समज दिली होती. परंतु, संबंधित व्यक्ती हे त्या महिलेला त्रास देण्याचे थांबवत नव्हते. त्यामुळे २२ नोव्हेंबर रोजी या महिलेच्या कुटुंबीयांनी जिल्हा पोलीस अधिक्षक यांच्याकडे देखील तक्रार अर्ज दिला. दोन-तीन दिवसांपूर्वीच दारासिंग पटले व बीनाबाई पटले यांनी डाकीण ठरवण्यात आलेल्या महिलेचा घराकडे जाणारा रस्ता काटे टाकून बंद केला. तसेच कुटुंबाला शिवीगाळ करणे, जीवे ठार मारण्याची धमकी देण्याचे प्रकार सातत्याने घडून येत आहेत.

बुधवारी (४ डिसेंबर) रोजी पीडित महिलेने शहादा येथील महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे राज्य सरचिटणीस विनायक सावळे, महिला कार्यवाह भारती पवार, प्रविण महिरे, सुवर्णा मोरे आदींची भेट घेऊन घडलेल्या प्रकाराची माहिती दिली. अंनिसच्या कार्यकर्त्यांनी पीडित महिला व कुटुंबीयांसह शहाद्याचे पोलीस उपविभागीय अधिकारी पुंडलिक सपकाळे यांची भेट घेऊन या प्रकरणात लक्ष घालण्याची निवेदन दिले. निवेदनाद्वारे पीडित महिलेला न्याय मिळवून देण्याची मागणी करण्यात आली असताना अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते व शहादा पोलीस ठाण्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी यांनी स्वतः गावाला जाऊन पीडित महिलेची समजूत घालून पीडिताच्या मनातील डाकीण असल्याची भिती काढली.

Last Updated : Dec 14, 2019, 11:32 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details