नंदुरबार: जिल्ह्यातून दुःखद घटना समोर आली आहे. नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव तालुक्यातील अलका वळवी या अंगणवाडी सेविकेने एकात्मिक बालविकास प्रकल्प विभागातील अधिकाराच्या शारीरिक सुखाच्या मागणीच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केली आहे. या अंगनवाडी सेविकेचे मागील 3 वर्षांपासून वेतन थकित होते. तिने वेतनसाठी विचारणा केली असता आयसीडीएस अधिकाऱ्यांकडून तिला त्रास दिला जात होता. या जाचाला कंटाळून तिने आत्महत्या केली.
शारिरीक सुखाची मागणी : कोरोना महामारीनंतर अनेक अंगणवाडी सेविका या आर्थिक विवंचनेमध्ये आहेत. कोरोनाच्या काळामध्ये जे कोविडयुद्धे काम करत होते. त्यामध्ये अंगणवाडी सेविका देखील महत्त्वाच्या भूमिका निभावत होत्या. नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव तालुक्यातील अंगणवाडी सेविका अलका वळवी यांना गेल्या तीन वर्षापासून महिला बालविकास विभागाकडून पगार दिला गेला नव्हता. तसेच एकात्मिक बालविकास प्रकल्प अधिकाऱ्यांनी तिच्याकडे शरीर सुखाची मागणी देखील केल्यामुळे तिने आत्महत्या केल्याचे सांगितले जात आहे. याप्रकरणी महिलेच्या पतीने तालुका शहादा गाव म्हसावद येथील जवळच्या पोलीस ठाण्यामध्ये तक्रार नोंदवलेली आहे.
थकित वेतनाची मागणी : अलका वळवी या महिलेने थकित वेतनासाठी आयसीडीएस अधिकाऱ्यांकडे विचारणा पण केली होती. मात्र अधिकाऱ्यांनी तिला मानसिक त्रास दिल्यामुळे तसेच शारीरिक सुखाची मागणी केल्याने तिने आत्महत्या केल्याची माहिती समोर येत आहे. तोरणमाळ या ठिकाणी एकात्मिक बालविकास प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांनी एक मीटिंग आयोजित केली होती. या मीटिंगला देखील अलका वळवी ही अंगणवाडी सेविका असल्याने हजर झाली होती.
जाच सहन झाला नाही : जुगनी गाव, हेरीचा पाडा व तालुका धडगाव जिल्हा नंदुरबार येथील ही आत्महत्या करणारी अलका वळवी 33 वय वर्षे वयाची अंगणवाडी सेविका गेल्या तीन वर्षापासून अनेकदा एकात्मिक बालविकास प्रकल्पाकडे निवेदन करून व्यथित झाली होती. तिच्या पतीला देखील हा जाच तिने सांगितला होता. मात्र तिला हा जाच आता सहन झाला नाही. त्यामुळे तिने आत्महत्या केली आहे, अशी माहिती अंगणवाडी कर्मचारी सभेच्या नेत्या अॅड. निशा शिवूरकर यांनी सांगितले.