महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नंदुरबारला पाणी पुरवठा करणारे आंबेबारा धरण ‘ओव्हरफ्लो’

नंदुरबार शहराला पाणीपुरवठा करणारे आंबेबारा धरण ओव्हरफ्लो झाले आहे. यामुळे शहरवासियांच्या पिण्याच्या पाण्याची चिंता मिटली आहे. यासोबतच विरचक प्रकल्पातील पाणीसाठ्यात देखील वाढ होत आहे.

Ambebara dam
आंबेबारा धरण

By

Published : Jul 27, 2020, 12:37 PM IST

नंदुरबार- साक्री तालुक्यात झालेल्या पावसामुळे नंदुरबार शहराला पाणीपुरवठा करणार्‍या आंबेबारा धरण क्षेत्रातील जलसाठा वाढला. यामुळे आंबेबारा धरण ओव्हरफ्लो होऊन ओसंडून वाहू लागले आहे. त्यामुळे शहरवासियांची पिण्याच्या पाण्याची चिंता काही प्रमाणात मिटली आहे.

आंबेबारा धरण हे गेल्यावर्षी ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पूर्ण क्षमतेने ओसंडून वाहू लागले होते. मागील दहा ते बारा वर्षात पूर्ण क्षमतेने ओसंडून वाहण्याची ही दुसरी वेळ आहे. आंबेबारा आणि खोलघर धरणातील ओसंडणाऱ्या पाण्याचा प्रवाह शिवण नदीत येत असल्यामुळे विरचक प्रकल्पातील पाणी साठ्यात वाढ होतेय.

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर वेगवेगळ्या यंत्रणा आपले कर्तव्य बजावत काम करत आहेत. जलसंपदा विभागातील कर्मचारी आंबेबारा धरणातून सोडण्यात आलेले पाणी 1 एप्रिल ते 20 मेपर्यंत कालव्याद्वारे आष्टे गावापर्यंत पोहोचले होते. यामुळे जलसंपदा विभागीतल कर्मचारी शहरवासियांसाठी ते जलदूत ठरले.

संचारबंदी काळात नागरिकांना वेळेवर पाणी मिळावे, म्हणून पालिकेतर्फे कालवा निरीक्षक रणजीतसिंग राजपूत आणि आर.बी.पाटील या दोन कर्मचार्‍यांना अत्यावश्यक सेवेसाठी नेमण्यात आले आहे. नंदुरबार शहरात आठ दिवसांची संचारबंदी लागू आहे. नदी काठावरील गावांच्या सतर्कतेसाठी जलदूत प्रयत्नशील आहेत.

गेल्यावर्षी देखील राज्यात पाणी टंचाई होती, परंतु आंबेबारा धरण पूर्ण क्षमतेने भरले होते. नंदुरबार शहराला त्यामुळे पाणीपुरवठा कमी पडला नाही, यासाठी जलदूतांचे मोठे सहकार्य नगरपालिकेला लाभले होते. जलदूतांच्या कार्याची दखल घ्यावी, म्हणून लोकप्रतिनिधींनी लेखी पत्राद्वारे जिल्हाधिकारी यांच्याकडे लक्ष वेधले आहे. परंतु धुळे पाटबंधारे विभाग व पाटबंधारे उपविभागाचे अधिकारी या गोष्टीपासून अनभिज्ञ असल्याचे समजते.

ABOUT THE AUTHOR

...view details