महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नंदुरबारमधील मुकबधिर विद्यालयातील दिव्यांगाना कृत्रिम अवयव साहित्याचे वाटप

इंडीयन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेड व जिल्हा समाज कार्यालय, नंदुरबार यांच्या सौजन्याने भारतीय कृत्रिम अंग निर्माण निगम (एलिम्को) तर्फे हे साहित्य वाटप करण्यात आले.

दिव्यांगाना कृत्रिम अवयव साहित्य वाटप

By

Published : Sep 11, 2019, 8:06 AM IST

नंदुरबार- जिल्ह्यातील मनुदेवी शिक्षक प्रसारक मंडळ संचलित मुकबधिर निवासी विद्यायल, दुधाळे शिवार या ठिकाणी मंगळवारी २५१ दिव्यांग विद्यार्थी आणि बांधवांना कृत्रिम अवयव साहित्याचे वाटप करण्यात आले. इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेड व जिल्हा समाज कार्यालय, नंदुरबार यांच्या सौजन्याने भारतीय कृत्रिम अंग निर्माण निगम (एलिम्को) तर्फे हे साहित्य वाटप करण्यात आले.

मुकबधिर विद्यालयात दिव्यांगाना कृत्रिम अवयव साहित्य वाटप करण्यात आले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खासदार डॉ. हिना गावित तर प्रमुख पाहुणे म्हणून माजीमंत्री तथा आमदार डॉ. विजयकुमार गावित, इंडियन ऑईलच्या वरिष्ठ डेपो प्रबंधक स्नेहल पवार, समाज कल्याण अधिकारी पटाईत, एलिम्कोचे किरण पावरा, कमलेश यादव, संस्थेचे चेअरमन राजेश चौधरी आदी उपस्थित होते. यावेळी खा. डॉ. हिनाताई गावित यांनी आपल्या मनोगतात दिव्यांगांसाठी शासन राबवित असलेल्या योजनांची माहिती दिली. त्या पुढे म्हणाले की, केंद्र शासनाकडे वेळोवेळी पाठपुरावा करुन दिव्यांग बांधवांसाठी यापुढे विविध साहित्य पुरविले जाईल. तसेच दिव्यांग बांधवांच्या पुनर्वसनासाठी मी नेहमी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन दिले.

हेही वाचा - नंदुरबार नगरपालिका अंतर्गत अपघातातील मृतांच्या वारसांना धनादेश वाटप

राजेश चौधरी यांनी जिल्ह्यात दिव्यांगांसाठी केलेल्या कार्याचा तसेच मुकबधिर शाळेत राबविलेल्या विविध उपक्रमांचे खा. डॉ.हिना गावित यांनी यावेळी कौतुक केले. तसेच इंडियन ऑईलने दिव्यांग बांधवांसाठी केलेल्या मदतीचेही खासदारांनी कौतुक केले. यावेळी सुमारे २५१ दिव्यांग विद्यार्थी व बांधवांना विविध कृत्रिम अवयव साहित्याचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विलास राजपूत यांनी केले. तर आभार मुख्याध्यापक सुनिल चौधरी यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी शाळेतील शिक्षक विनोद चौधरी, लखन चौधरी, गौरव वसईकर, श्रीमती पाटील तसेच शिक्षकेतर कर्मचार्‍यांनी परिश्रम घेतले.

हेही वाचा - सत्यशोधक ग्रामीण कष्टकरी संघटनेच्यावतीने शेतकऱ्यांचा मोर्चा

ABOUT THE AUTHOR

...view details