नंदुरबार -वागदी हे नवापूर तालुक्यातील डोंगर पायथ्याशी असलेले गाव आहे. सोमवारी वागदी गावातील ग्रामपंचायत कार्यालयात ग्रामसभा घेऊन दारुबंदीवर एकमताने ठराव पास करण्यात आला. २२ जुलै २०१९ पासून गावात दारूबंदी होणार, असा ठराव पास करण्यात आला. ग्रामसभेमध्ये वारंवार गावातील महिला बचत गटांद्वारे गावात दारूबंदी करावी, असा विषय मांडला जात होता. त्यावर गावातील सर्व नागरिक, सरपंच, सदस्य, पोलीस पाटील यांच्याशी संवाद साधून ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले.
नवापूर तालुक्यातील वागदी गावात ग्रामसभेत दारुबंदीचा ठराव पास
सोमवारी वागदी गावातील ग्रामपंचायत कार्यालयात ग्रामसभा घेऊन दारुबंदीवर एकमताने ठराव पास करण्यात आला. २२ जुलै २०१९ पासून गावात दारूबंदी होणार, असा ठराव पास करण्यात आला.
गावातील महिला, पुरुष व ग्रामपंचायत सरपंच आणि सदस्य यांच्या उपस्थितीत एकमताने दारुबंदीचा ठराव पास करण्यात आला. गावात १०० टक्के देशी दारू, सट्टा, जुगार, बंद राहतील असे स्पष्ट करण्यात आले. गावात दारूची तस्करी करणारी वाहने किंवा शेतात व जंगलात जाऊन दारू तयार करताना आढळल्यास पेसा (PESA) कायद्याअंतर्गत कारवाई करून दंड आकारण्यात येणार आहे. वागदी गावातील महिला बचत गट आणि ग्रामपंचायतीने एकत्र येऊन दारूबंदी सारखा चांगला निर्णय घेत गावाला विकासाची दिशा दाखवली आहे.