नंदुरबार- पोलीस म्हटलं की सर्व सामान्यांची भावना जरा नाराजीच्या सुरातलीच असते. मात्र खाकी वर्दीततल्या व्यक्तीतही माणुसकीचा धर्म असतो, याची प्रचिती अक्कलकुवा येथील पोलीस ठाण्यात पाहावयास मिळाली आहे.
खाकी वर्दीतील माणुसकीचे दर्शन! अक्कलकुवाच्या पोलिसांनी मनोरुग्णासोबत साजरी केली दिवाळी - अक्कलकुवा पोलिसांची माणुसकी
अक्कलकुवा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मेघश्याम डांगे यांनी स्वत: त्या वेडसर व्यक्तीचे दिवाळी निमित्त केस कापून, आंघोळ घालून त्याला स्वच्छ केले आहे. तसेच त्याला नवीन कपडे नेसवून त्याचे रुपचं पालटले आहे. या घटनेमूळे तालुक्यात खाकी वर्दीतील माणूसकीचा विषय चर्चेचा झाला आहे.
अक्कलकुवा शहरात वेडसर पणाने फिरणार्या एका मनोरुग्णाला येथील पोलीस अधिकाऱ्यांनी दिवाळीचा आनंद मिळवून दिलाय. अक्कलकुवा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मेघश्याम डांगे यांनी स्वत: त्या वेडसर व्यक्तीचे दिवाळी निमित्त केस कापून, आंघोळ घालून त्याला स्वच्छ केले आहे. तसेच त्याला नवीन कपडे नेसवून त्याचे रुपचं पालटले आहे. या घटनेमूळे तालुक्यात खाकी वर्दीतील माणुसकीचा विषय चर्चेचा झाला आहे.
गेल्या वर्षी देखील पोलीस निरीक्षक मेघश्याम डांगे यांनी अशाच प्रकारे याच अवलियाला स्वच्छ करून त्याच्या घरी पोहोचवले होते. मात्र परत हा अवलिया अक्कलकुवा शहरात फिरताना दिसून आला. त्यानंतर डांगेंनी त्याला हेरून त्याला स्वच्छ करत त्याचे रुप पालटले आहे. या कृतीचे तालुक्यातून कौतुक केले जात आहे. यावेळी पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर बडगुजर, योगेश्वर बुवा, शुभम भंसाली, पोलीस को. संदीप महाले, रविंद्र साळवे, होमगार्ड राजेश तवर, मनोज गुलाले बापू राठोड उपस्थित होते.