नंदुरबार - गेल्या महिन्याभरापासून वरुणराजाने दडी मारल्यानंतर शुक्रवारी रात्री 8 वाजण्याच्या सुमारास शहरासह परिसरात पावसाने दमदारी हजेरी लावली. या पावसामुळे पिकांना फायदा होणार असल्याने शेतकर्यांना दिलासा मिळाला आहे.
नंदुरबार : महिनाभराच्या प्रतीक्षेनंतर वरुणराजाची दमदार हजेरी - नंदुरबारमध्ये दमदार पाऊस
बऱ्याच प्रतिक्षेनंतर अखेर शुक्रवारी रात्री नंदुरबार शहरासह परिसरात पावसाला सुरुवात झाली. तब्बल दोन ते अडीच तास दमदार पाऊस झाल्याने वातावरणात गारवा निर्माण झाला. यामुळे उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. तसेच परिसरातील शेतातील पिकांना या पावसाचा फायदा होणार असल्याचे शेतकर्यांकडुन समाधान व्यक्त होत आहे.
हेही वाचा - 'हतनूर' धरणाचे 24 दरवाजे उघडले; 888.00 क्यूमेक्स वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू
महिन्याभरापूर्वी शहरासह जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली होती. तेव्हापासून पावसाने दडी मारल्यामुळे वातावरणात बदल झाला होता. यामुळे दिवसा आणि रात्री उकाडा जाणवत असल्याने नागरिकही हैराण झाले होते. तसेच शेतकर्यांनी खरीप हंगामाची पेरणी केल्याने पावसाच्या आगमनाकडे सगळ्यांचे लक्ष लागुन होते. बऱ्याच प्रतिक्षेनंतर अखेर शुक्रवारी रात्री शहरासह परिसरात पावसाला सुरुवात झाली. तब्बल दोन ते अडीच तास दमदार पाऊस झाल्याने वातावरणात गारवा निर्माण झाला. यामुळे उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. तसेच परिसरातील शेतातील पिकांना या पावसाचा फायदा होणार असल्याचे शेतकर्यांकडुन समाधान व्यक्त होत आहे. कापसाच्या पिकांनाही या पावसामुळे जीवनदान मिळाले असल्याने शेतकऱ्यांवरील दुबार पेरणीचे संकट टळले आहे.