नंदुरबार- जिल्ह्यातील चारही विधानसभा मतदारसंघातील मतमोजणीची तयारी जिल्हा प्रशासनाच्या वतीने पूर्ण करण्यात आली आहे. मोठा पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आला असून मतमोजणी होत असलेल्या ठिकाणाजवळच्या वाहतूक मार्गात बदल करण्यात आला आहे.
नंदुरबारमध्ये मतमोजणीची तयारी पूर्ण; प्रशासन सज्ज - nandurbar election results live update
जिल्ह्यातील चारही विधानसभा मतदारसंघातील मतमोजणीची तयारी जिल्हा प्रशासनाच्या वतीने पूर्ण करण्यात आली आहे.
नंदुरबार विधानसभा मतदारसंघासाठी मतमोजणी वखार महामंडळाच्या गोडाऊनमध्ये होणार आहे. तर नवापूर विधानसभा मतदारसंघातील मतमोजणी नवापूर शहरातील टाऊन हॉलमध्ये होणार आहे. अक्कलकुवा विधानसभा मतदारसंघातील मतमोजणी तहसील कार्यालयाच्या नवीन इमारतीच्या परिसरात होणार असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाच्या वतीने देण्यात आले आहे.
चारही विधानसभा मतदारसंघात 16 टेबलवर मतमोजणी होणार असून दुपारी एक वाजेपर्यंत निकाल हाती लागण्याची शक्यता जिल्हा प्रशासनाच्या वतीने व्यक्त करण्यात आली आहे. मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर अक्कलकुवा, नंदुरबार, शहादा आणि नवापूर शहरात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. या चार ही शहरातील काही वाहतुकीच्या मार्गात बदल करण्यात आल्याची माहिती जिल्हा प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे.