महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नंदुरबारमध्ये राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई; लाखोंचा विदेशी मद्यसाठा जप्त - राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई नंदुरबार

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्कच्या भरारी पथकाने नवापूर तालुक्यातील लकडकोट येथे विदेशी मद्यसाठा जप्त केला आहे. या कारवाईत ५ लाख ७१ हजार किमतीचा मद्यसाठा जप्त करण्यात आला.

राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई

By

Published : Oct 13, 2019, 8:56 AM IST

नंदुरबार - विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्कच्या भरारी पथकाने नवापूर तालुक्यातील लकडकोट येथे विदेशी मद्याचा साठा जप्त केला आहे. या कारवाईत ५ लाख ७१ हजार किमतीचा मद्यसाठा जप्त करण्यात आला. राज्य उत्पादन शुल्क पथकाला मिळालेल्या माहितीवरून ही कारवाई करण्यात आली.

राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई

हेही वाचा -धुळे: शिरपूर तालुका पोलिसांकडून 72 हजार रुपयांचा अवैध मद्यसाठा जप्त

तालुक्यातील लक्कडकोट येथे मारुती सुझुकी रीट्झ (एम एच १२ केएन ९८५१) या वाहनाचा पाठलाग करून थांबवून चालकाची विचारपूस केली असता चालकाने उडवाउडवीची उत्तरे दिली. पोलिसांनी गाडीची तपासणी केली असता गाडीतून विविध कंपन्यांचा ५ लाख ७१ हजार किमतीचा मद्यसाठा जप्त करण्यात आला.

हेही वाचा -पालघर जिल्ह्यात सिल्वासा येथून येणारा मद्यसाठा जप्त

दरम्यान, या घटनेतील आरोपी फरार असून त्याच्यावर दारूबंदी कायदा १९४१ अंतर्गत कारवाई करण्यात आली. ही कारवाई नाशिक विभाग आणि नंदुरबार अधीक्षक युवराज राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली भरारी पथकाचे निरिक्षक मनोज संबोदी, निरीक्षक अनुपकुमार देशमाने, सुभाष बाविस्कर, प्रशांत पाटील, योगेश पाटील, योगेश सूर्यवंशी तसेच पोलीस शिपाई हेमंत पाटील, अजय रायते, हर्षल नांदरे यांनी केली.

हेही वाचा -त्र्यंबकेश्वर परिसरात राज्य उत्पादन शुल्क विभागाचा छापा; लाखो रुपयांचा मद्यसाठा जप्त

ABOUT THE AUTHOR

...view details