नंदुरबार - महाराष्ट्र-गुजरात सीमावर्ती भागातील उच्छल निझर रस्त्यावर टेम्पो व ट्रॅक्टरची समोरासमोर धडक झाल्याने पुलाखाली ट्रॅक्टर कोसळल्याने एकाचा मृत्यू तर एक गंभीर जखमी झाला आहे. टेम्पोने ट्रॅक्टरला जोरदार धडक दिल्याने चालकाचा जागीच मृत्यू झाला. घटनास्थळी पोलीस व रुग्णवाहिका पोहोचली असून मदतकार्य सुरू आहे.
महाराष्ट्र-गुजरात सीमेवर अपघात; एकाचा मृत्यू तर १ गंभीर - महाराष्ट्र गुजरात सीमा
गुजरात राज्यातील उच्छल तालुक्यातील देवचांदणी गावाजवळील पुलावर हा अपघात झाला. जेसीबीच्या साहाय्याने टेम्पोमधील मृत चालकाला बाहेर काढले. गंभीर जखमींना उच्छल रुग्णालयात दाखल करण्यात आले.
गुजरात राज्यातील उच्छल तालुक्यातील देवचांदणी गावाजवळील पुलावर हा अपघात झाला. जेसीबीच्या साहाय्याने टेम्पोमधील मृत चालकाला बाहेर काढले. गंभीर जखमींना उच्छल रुग्णालयात दाखल करण्यात आले. नवापूर तालुक्यातील उच्छल तालुक्यातील देव चांदणी गावाजवळ भीषण अपघात घडला. यात टेम्पोचालक जागीच ठार झाला असून ट्रॅक्टर चालक गंभीर जखमी झाला आहे.
ग्रामस्थांनी तत्काळ 108 या क्रमांकावर रुग्णवाहिकेसाठी फोन केल्यानंतर ट्रॅक्टर चालकास नवापूर येथे रुग्णालयात दाखल करण्यात आले. पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून जेसीबीच्या साहाय्याने टेम्पोला पुलावरून बाहेर काढण्यात आले. पुढील तपास उच्छल पोलीस करीत आहेत.