महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

रिक्षा व डंपरमध्ये भीषण अपघात; दोघांचा जागीच मृत्यू, ५ गंभीर - नंदुरबार रिक्षा डंपर भीषण अपघात

नंदुरबारपासून 10 ते 12 किलोमीटर अंतरावर असलेल्या कोळदा गावाजवळ रिक्षा व डंपरमध्ये भीषण अपघात झाला असून, यात दोघांचा जागीच मृत्यू तर पाच जण गंभीर जखमी झाले आहेत.

accident
रिक्षा व डंपरमध्ये भीषण अपघात

By

Published : Feb 8, 2020, 4:20 PM IST

Updated : Feb 8, 2020, 4:41 PM IST

नंदुरबार -शहादा रस्त्यावरील कोळदा गावाजवळ रिक्षा आणि डंपरमध्ये भीषण अपघात झाला. अपघातामध्ये दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे तर पाच जण गंभीर जखमी झाले. जखमींवर नंदुरबार जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जखमींपैकी एकाची प्रकृती चिंताजनक असून त्याला पुढील उपचारासाठी धुळे येथे हलविण्यात आले आहे.

रिक्षा व डंपरमध्ये भीषण अपघात

हेही वाचा - नांदेड : प्रेमी युगुलाला लुटणाऱ्या तीनही आरोपींच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या

नंदुरबारपासून 10 ते 12 किलोमीटर अंतरावर असलेल्या कोळदा गावाजवळ हा अपघात झाला. रिक्षामध्ये चालकासह 9 प्रवासी होते. भरधाव येणाऱ्या डंपरने रिक्षाला जोरदार धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की, रिक्षाचा चक्काचूर झाला. रिक्षातील दोघांचा जागीच मृत्यू तर उर्वरित सहा जणांपैकी पाच जणांची प्रकृती गंभीर असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. यात दोन लहान बालके देखील आहेत त्यापैकी एका बालकाच्या डोक्याला गंभीर इजा झाली.

गुजरात राज्यातून महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात वाळूची वाहतूक केली जाते. वाहतूक करणारे डंपर वेगाने जात असल्याने जिल्ह्यात अपघातांचे सत्र सुरू झाले असल्याचे चित्र समोर येत आहे. गुजरातमधून जाणाऱ्या वाळूच्या डंपरवर कारवाई करण्याची मागणी आता होऊ लागले आहे.

हेह वाचा - यासाठी 'ते' करायचे 'पबजी' गेमचा वापर

Last Updated : Feb 8, 2020, 4:41 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details