महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पिकअप व्हॅन व दुचाकीचा अपघात; दुचाकीस्वार जागीच ठार, दोन जखमी - नंदुरबार दुचाकीस्वर अपघात

पिकअप व्हॅन व दुचाकी अपघातामध्ये दुचाकास्वार ठार झाला. विसरवाडीकडे भरधाव पिकपने अचानक ब्रेक मारल्याने मागून येतल असलेली दुचाकी पिकपला धडकली व दुचाकीस्वार ठार झाला तर दोन जण जखमी झाले आहेत.

योहान जयंत्या गावीत

By

Published : Nov 13, 2019, 9:41 AM IST

नंदुरबार - पिकअप व्हॅन व दुचाकी अपघातामध्ये दुचाकीस्वार जागीच ठार झाला. विसरवाडीकडे भरधाव पिक अपने अचानक ब्रेक मारल्याने मागून येत असलेली दुचाकी पिकअप व्हॅनला धडकली व दुचाकीस्वार ठार झाला तर दोन जण जखमी झाले आहेत.

हेही वाचा - हिंगोलीत अज्ञातांनी फोडल्या बसच्या काचा; औंढा नागनाथ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

विसरवाडी-देवलीपाडा रस्त्यावर काल पिकअप व्हॅन (क्रमांक- एमएच 39 सी 9314) भरधाव वेगात जात असताना चालकाने अचानक ब्रेक मारल्यामुळे मागून येणारी दुचाकी (क्रमांक- एमएच 39 एल 1278) पिकअप व्हॅनला धडकली. या अपघातात योहान जयंत्या गावीत (रा.देवलीपाडा, ता.नवापूर) यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. तसेच प्रकाश भिमसिंग गावीत (वय-12), भिमसिंग लालजी गावीत (40) हे दोघेही पिता-पुत्र अपघातात जखमी झाले.

मृत योहान गावीत हा देवलीपाडा येथून विसरवाडीकडे जात असताना अपघात झाला. भिमसिंग गावीत याच्या तक्रारीवरुन पिकअप व्हॅन चालक किलू हाड्या गावीत (रा.देवलीपाडा) यांच्याविरुध्द विसरवाडी पोलीस ठाण्यात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा - औरंगाबादमध्ये बनावट कागदपत्राद्वारे जामीन मंजूर करुन घेणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

ABOUT THE AUTHOR

...view details