नंदुरबार - भारतीय स्वातंत्र्य संग्रामात अनेक क्रांतिकारकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली आहे. विशेष करून जनजातीमधील कित्येक क्रांतिकारकांचा त्यात समावेश आहे. मात्र, त्यांची कुठेही नोंद नाही. गावोगाव जाऊन अशा क्रांतिकारकांची नोंद करून त्यांची खरी माहिती देशवासियांसमोर आणणे गरजेचे आहे. त्यासाठी विद्यार्थी परिषदेकडून क्रांतिकारकांची खरी माहिती संकलित केली जात आहे. पाठ्यपुस्तकात अशा अनामिक क्रांतिकारकांची माहिती देणे अपेक्षित आहे, असे प्रतिपादन जनजाती आयोगाचे राष्ट्रीय अध्यक्ष हर्ष चौहान यांनी नंदुरबार येथे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे ५६ वे महाराष्ट्र प्रदेश अधिवेशनचे उद्घाटन करताना केले.
माहिती देताना अभिनेता सोमन आणि राष्ट्रीय जनजाती आयोगाचे अध्यक्ष हर्ष चव्हाण हेही वाचा -Rupali Chakankar Criticized Chandrakant Patil : 'चंद्रकात दादा बोलतात कमी बरळता जास्त'
नंदुरबार येथील छत्रपती शिवाजी महाराज नाट्यमंदिरात अभाविपचे तीन दिवसीय ५६ वे महाराष्ट्र प्रदेश अधिवेशन होत आहे. चौहान यांच्या हस्ते स्वामी विवेकानंद व सरस्वती मातेच्या प्रतिमेचे पूजन करून अधिवेशनाचा शुभारंभ करण्यात आला. प्रसिद्ध सिनेअभिनेते योगेश सोमण, अभाविपचे राष्ट्रीय संघटन मंत्री आशिष चौहान, पश्चिम महाराष्ट्र प्रदेश मंत्री अनिल ठोंबरे, देवगिरी प्रदेश अध्यक्ष प्रा. सारंग जोशी, देवगिरी प्रदेश मंत्री अंकिता पवार हे उपस्थित होते.
हिजाब घालणे किंवा न घालणे यावर सॉलिड बंवडर तयार होईल अशा पद्धतीने काही लोक बोलून त्यावरच काऊंटर करत आहेत. काही काळापूर्वी बुरख्याविरोधात बोलेली हिच लोक इथल्या राजकीय सिस्टीम विरोधात बोलून निवडणुकीत उपयोग होईल, अशा पद्धतीने संसदेत आणि बाहेर हास्यास्पदरित्या बोलत असल्याची टिप्पनी अभिनेता योगेश सोमण यांनी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या व्यासपीठावरून केली. केरळ न्यायालयाने शाळांच्या ड्रेसकोडबाबत दिलेल्या निर्णयानुसार पालन करून जिथे ड्रेसकोडबाबत नियमावली नाही अशा ठिकाणी अभिव्यक्ती स्वातंत्र्याप्रमाणे ड्रेस घालण्याची मुभा असल्याचे मत देखील त्यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले.
अभिनेते डॉ. योगेश सोमन यांनी सांगितले की, सोशल मीडिया त्वरित संपर्क आणि विचार प्रसार करण्याचा महामार्ग असल्यामुळे हिंदुत्व आणि राष्ट्रीयत्व या विषयी बुद्धिभेद करण्यात तथाकथित पुरोगामी यशस्वी होत आहेत. त्यांचे षडयंत्र समजून घेत उत्तर देण्यासाठी विद्यार्थ्यांनी सरसावले पाहिजे. व्हर्च्युअल नेटवर्कवर स्वार होऊन राष्ट्रीयत्वाचे विचार प्रसारित करा. परंतु, व्हर्च्युअल नेटवर्क म्हणजे खरे संघटन नव्हे. प्रत्यक्ष संपर्क प्रस्थापित करा. सोशल आक्रमकतेला ठोस उत्तर द्यायला तयार व्हा, छत्रपतींनी अफजलखानाचा केलेला वध हे पहिले सर्जिकल स्ट्राइक होते, असेही डॉक्टर योगेश सोमन म्हणाले.
राष्ट्रीय जनजाती आयोगाचे अध्यक्ष हर्ष चव्हाण यांनी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या 56 व्या राज्य अधिवेशनात विद्यार्थ्यांचे महत्व विषद करताना विद्यार्थींचा अर्थ आहे नविनता, शोध, आवाहन असे असून या तिन्ही गोष्टींनीच समाज परिवर्तन घडत असल्याचे नमुद केले आहे. विद्यार्थी हा निडर पद्धतीने सत्य बोलत असल्याने अखिल भारतीय विद्यार्थी परिषद सारख्या संघटना समग्र दृष्टिकोनातून समाजातील समस्यांचा शोध घेणे आणि त्यांचा समाधान शोधण्यासारख्या सर्व गोष्टी शिकण्यावर जास्त भर देण्याल्या महत्व देत असल्याने त्याचं वेगळेपण इतरांपेक्षा जास्त असल्याचे हर्ष चव्हाणांनी सांगितले.
हर्ष चव्हाण पुढे म्हणाले की, जनजाती समाजातील तंट्या, भिल्ल, बिरसा मुंडा आदींच्या प्रतिमा स्थापन करणे व इतिहासाला उजाळा देणे हा फक्त राजकीय उपचार म्हणून पाहिले जाऊ नये. जनजाती समाजातील विद्यार्थी स्वतः म्हणत आहेत की, यामुळे त्यांना एक नवी ओळख प्राप्त होत आहे. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे आजपर्यंतच्या कार्याचे वैशिष्ट्य राहिले आहे की, या व्यासपीठाच्या माध्यमातून विद्यार्थी घडवले जात आहेत. अन्यायाविरोधात आंदोलन करणे, नव्याचा शोध घेणे आणि नवा विचार देणे या स्तरावर कार्य करणाऱ्यांना जोडले जात आहे. विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून राष्ट्रीय दायित्व घ्यायला आज मोठ्या प्रमाणात विद्यार्थी तयार होत आहेत, ही अभिनंदनीय बाब आहे.
यावेळी डॉ. कांतीलाल टाटीया यांच्या क्रांतिकारक ख्वाजा नाईक यांचा गौरवशाली इतिहास, या पुस्तकाचे प्रकाषण करण्यात आले. या अधिवेशनामध्ये शैक्षणिक, सामाजिक व शिक्षण क्षेत्रातील बदल या विषयांवर प्रस्ताव पारित करण्यात आले. प्रदेशमंत्री प्रतिवेदनामध्ये अभाविपच्या मागील वर्षाच्या कार्याचे सिंहावलोकन करण्यात आले. तसेच 2022-23 या शैक्षणिक वर्षासाठी पश्चिम महाराष्ट्र व देवगिरी या दोन प्रांताचे प्रदेश मंत्री, प्रदेश अध्यक्षांची निवड केली जाईल. अधिवेशन दोन सत्रांमध्ये होईल. या अधिवेशनासाठी राज्यातून सुमारे 200 प्रतिनिधी सहभागी झाले आहेत. शैक्षणिक बदल, शिक्षण क्षेत्रातील गैरव्यवहारावर आसूड या विषयी प्रबोधन करण्यात येईल. हे अधिवेशन १३ फेब्रुवारी पर्यंत चालणार आहे.
हेही वाचा -Dhadgaon Nagar Panchayat Result : धडगाव नगरपंचायतीत शिवसेनेची सत्ता कायम; आदिवासी विकास मंत्र्यांना धक्का