नंदुरबार : जिल्ह्यातील २०६ ग्रामपंचायतींसाठी निवडणूक ( Grampanchayat Election 2022 ) प्रक्रिया पार पडत आहे. ( Election process for Gram Panchayats ) यात माघारीअंती तळोदा तालुक्यातील ४, नवापूर ३ तर अक्कलकुवा तालुक्यातील १ ग्रामपंचायत अशा एकूण ८ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत. उर्वरित १९८ ग्रामपंचायतींसाठी आज प्रत्यक्ष मतदान प्रक्रिया पार पडणार असून यात लोकनियुक्त सरपंच पदासाठी एकूण ७८१ उमेदवार नशीब आजमावणार आहेत.
धडगाव तालुक्यातील २५ ग्रामपंचायतींसाठी ३९ हजार, नवापूर तालुक्यातील ७८ग्रामपंचायतींसाठी १ लाख २२ हजार २०८ मतदार हक्क बजावणार आहेत. तसेच तळोदा तालुक्यातील ५३ ग्रामपंचायतींसाठी ७३ हजार २५२ मतदार तर व अक्कलकुवा तालुक्यातील ४४ ग्रामपंचायतींसाठी ९० हजार १२९ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. कालच मतदान कर्मचारी मतदान केंद्रांवर रवाना झाले आहेत. कायदा आणि सुव्यवस्थेच्यादृष्टीने सुमारे १३५० पोलीस कर्मचाऱ्यांचा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. १९८ ग्रामपंचायतींसाठी सव्वा तीन लाख मतदार आज बजावणार हक्क. ( Quarter of three lakh voters will use their rights today )
अक्कलकुवा येथे 44 ग्रामपंचायतींसाठी निवडणूक :अक्कलकुवा तालुक्यात तालुक्यातील ४४ ग्राम पंचायतींच्या निवडणूकीच्या मतदानासाठी निवडणूक यंत्रणेचे कर्मचारी मतदान केंद्राकडे रवाना झाले आहेत. अक्कलकुवा तालुक्यातील ४४ ग्रामपंचायतींसाठी आज दि.१६ ऑक्टोबर रोजी मतदान होणार आहे. ४४ ग्रामपंचायतींसाठी १५५ मतदान केंद्रावर मतदानाची प्रकिया पार पडणार आहे. ४४ सरपंच व ४०९ सदस्यांच्या निवडीसाठी मतदान होत आहे. मतदान प्रक्रियेसाठी आज सकाळी ९ वाजेपासून तहसिल कार्यालयात कर्मचाऱ्यांची आपले निवडणूक साहित्य घेण्यासाठी गर्दी जमली होती.
१५५ टीममधुन ७७५ कर्मचारी मतदान केंद्रांकडे रवानावेगवेगळ्या काउंटरवरुन नेमुन दिलेल्या ग्रामपंचायतींचे साहित्य कर्मचाऱ्यांनी ताब्यात घेतले. काल सकाळी ११ वाजेनंतर नेमुन दिलेल्या १६ बसेस व ६५ चारचाकी वाहनाद्वारे १५५ टीममधुन ७७५ कर्मचारी मतदान केंद्रांकडे रवाना झालेत तर १५ टीममधुन ७५ कर्मचारी हे राखीव ठेवण्यात आले आहेत. पोलीस बंदोबस्तात १ पोलीस उप अधिक्षक, १ पोलीस निरीक्षक, ८ पोलीस उप निरीक्षक, १५५ पोलीस, ३५ महिला पोलीस, २ एस.आर.पी. प्लाटून, १०४ होम गार्ड,१८ महिला होम गार्ड असा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे, अशी माहिती पोलीस निरीक्षक अन्साराम आगरकर यांनी दिली. ग्रामपंचायतीच्या निवडणूकीसाठी ९० हजार १२९ मतदार मतदानाचा अधिकार बजावणार आहेत. मतदानासाठी यंत्रणा पाठविण्यासाठी सकाळपासुन तहसिलदार सचिन मस्के, निवासी नायब तहसीलदार दिलीप गांगुर्डे व तहसिल कार्यालयातील कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.
नवापुरात 81 ग्रामपंचायतींसाठी निवडणूक :नवापूर तालुक्यातील ८१ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीत ३ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्याने उद्या दि.१६ रोजी रविवारी ७८ ग्रामपंचायतीसाठी मतदान होणार आहे. शनिवारी प्रशासनाने मतदान प्रक्रिया पार पाडण्यासाठी १५०० कर्मचाऱ्यांना मतदान केंद्रावर रवाना केले.
नवापूर तालुक्यातील ८१ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीत ३ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्याने ७८ ग्रामपंचायतीसाठी प्रत्यक्ष होणाऱ्या मतदान प्रक्रियेसाठी प्रशासन सज्ज झाले असून शनिवारी येथील वरिष्ठ महाविद्यालयाचा प्रशस्त प्रांगणात निवडणूक साहित्य वितरण करण्यात आले. नियुक्त कर्मचाऱ्यांनी आपापले निवडणुकीचे साहित्य घेवून तालुक्यातील ७८ ग्रामपंचायतींच्या मतदानासाठी नवापूर तालुक्यातील एकूण २५४ मतदान केंद्रावर प्रत्येकी ६ कर्मचारी असे जवळपास १५२४ कर्मचारी रवाना झालेत. नवापूर तालुक्यातील ८१ ग्रामपंचायतीं पैकी ३ बिनविरोध झाल्याने रविवारी ७८ ग्रामपंचायतीसाठी मतदान होणार आहे.