महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

सारंगखेडा यात्रोत्सवात यंदा सहा लाखांचे सर्वात महाग अश्व - sarangkheda horse fair 2019

सारंगखेडा येथील घोडे बाजारात यावर्षी सर्वात जास्त बोली मध्यप्रदेशमधील घोडे व्यापारी शुभमसिंह तंवरसिंह राजपूत यांच्या माधुरी या घोडीवर लागले आहे. औरंगाबाद येथील नितेश राजपूत या अश्व शौकिनाने ही घोडी तब्बल ६ लाख रुपयांना खरेदी केली आहे.

nandurbar
सारंगखेडा घोडे बाजार

By

Published : Dec 19, 2019, 1:13 PM IST

Updated : Dec 19, 2019, 3:10 PM IST

नंदुरबार -दत्तजयंतीपासून सुरू झालेल्या सारंगखेडा येथील घोडे बाजारात आतापर्यंत २ हजार ५०० घोडे विक्रीसाठी दाखल झाले आहेत. यामध्ये आत्तापर्यंत विक्री झालेल्या घोड्यांमध्ये सर्वात जास्त ६ लाख रुपयांची बोली माधुरी या घोडीवर लागली आहे.

सारंगखेडा घोडे बाजार

सारंगखेडा येथील घोडे बाजारात यावर्षी सर्वात जास्त बोली मध्यप्रदेशमधील घोडे व्यापारी शुभमसिंह तंवरसिंह राजपूत यांच्या माधुरी या घोडीवर लागले आहे. औरंगाबाद येथील नितेश राजपूत या अश्व शौकिनाने ही घोडी तब्बल ६ लाख रुपयांना खरेदी केली आहे.

हेही वाचा -नंदुरबारमध्ये 4 लाखांचा विदेशी मद्याचा अवैध साठा जप्त

या वर्षातील ही सर्वात जास्त बोली आहे. मागील वर्षी उत्तर प्रदेश बरेली येथील व्यापाराने या घोडे बाजारातून २१ लाख रुपयांना घोडा खरेदी केल्याची नोंद करण्यात आली होती. घोडेबाजारात चांगलीच तेजी दिसून येत असून ६ दिवसात घोडे बाजाराने २ कोटी ७५ लाखांचा आकडा पार केला आहे. येत्या १० दिवसात घोड्यांच्या खरेदीचा उच्चांक गाठला जाईल असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

हेही वाचा - शहादा बस स्थानकात अज्ञात व्यक्तीचा मृतदेह सापडल्याने खळबळ

Last Updated : Dec 19, 2019, 3:10 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details