नंदुरबार - शेजारच्या शेतात लागलेल्या ऊसाची आग आपल्या शेतातील गव्हाच्या पिकात पोहचू नये यासाठी आग विझवण्यासाठी गेलेल्या संजय एकनाथ चौधरी (वय 56) या शेतकऱ्याचा आगीत होरपळून मृत्यू झाला. ही घटना शहादा तालुक्यातील बामखेडामध्ये घडली. याबाबत सारंगखेडा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
ऊसाच्या शेताला लागलेली आग विझवताना शेतकऱ्याचा आगीत होरपळून मृत्यू - शेतकरी संजय चौधरी मृत्यू बामखेडा
शेजारच्या शेतात लागलेल्या ऊसाची आग आपल्या शेतातील गव्हाच्या पिकात पोहचू नये, यासाठी आग विझवण्यासाठी गेलेल्या संजय एकनाथ चौधरी या ५६ वर्षीयशेतकऱ्याचा आगीत होरपळून मृत्यू झाला. ही घटना शहादा तालुक्यातील बामखेडा मध्ये घडली.
शहादा तालुक्यातील बामखेडा येथील गणेश पटेल यांच्या शेतातील ऊसाला काल दुपारी आग लागली होती. ही आग शॉटसर्कीटमुळे लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. परिसरातील शेतकऱ्यांनी आग विझविण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले. शेतात असलेल्या विहिरी व बोरवेलच्या साहायाने आग विझविण्याचा शेतकऱ्यांनी प्रयत्न केला. मात्र, ऊस जळून खाक झाला.
उसाच्या शेतातील आगीने रौद्ररूप धारण केले. शेजारच्या शेतातील आग वाढून आपल्या शेतात येऊ नये आणि आपल्या शेतातील गव्हाच्या पिकांचे नुकसान होऊ नये म्हणून शेतकरी संजय चौधरी हे आग विझवण्याचा प्रयत्न करत होते. मात्र, आग विझवताना त्यांचा आगीत होरपळून मृत्यू झाला. आग विझवताना त्यांचा पाय ऊसात उडकून पडल्याने ही घटना घडल्याचा अंदाज व्यक्त केल्या जात आहे. या प्रकरणी सारंगखेडा पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली असून, घटनेप्रकरणी परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.