महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नंदुरबारमध्ये पतंग उडविणार्‍या मुलाचा तोल जाऊन मृत्यू

नंदुरबार शहरातील मलकवाडा येथील रहिवासी रऊफ फारुख पिंजारी (वय-15) हा मलकवाडा परिसरातील बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवर पतंग उडवीत असताना अचानक तोल जाऊन खाली पडल्याने गंभीर जखमी झाला.

नंदुरबारमध्ये पतंग उडविणार्‍या मुलाचा तोल जाऊन मृत्यू
रऊफ फारुख पिंजारी

By

Published : Jan 12, 2020, 7:42 PM IST

नंदुरबार -पतंग उडविणार्‍या मुलाचा तोल जाऊन खाली पडल्याने दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना नंदुरबार शहरात घडली आहे. या घटनेमुळे मलकवाड्यावर शोककळा पसरली आहे.

हेही वाचा - बीडमध्ये विषबाधा झाल्याने युवकाचा मृत्यू, प्रेम प्रकरणातून हत्या झाल्याचा घरच्यांचा आरोप

नंदुरबार शहरातील मलकवाडा येथील रहिवासी रऊफ फारुख पिंजारी (वय-15) हा मुलगा मलकवाडा परिसरातील बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवर पतंग उडवीत असताना अचानक तोल जाऊन खाली पडल्याने गंभीर जखमी झाला. यावेळी गंभीर जखमी झालेल्या रऊफ पिंजारी यास उपचारासाठी नंदुरबार जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. वैद्यकीय अधिकार्‍यांनी रऊफ पिंजारी यास मृत घोषित केले. रजा अहमद पिंजारी यांच्या सांगण्यावरुन नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलील शिपाई चव्हाण करित आहेत.

हेही वाचा - 'जेवताना मोबाईलवर बोलू नको', वडिलांनी बजावल्यामुळे तरुणीची आत्महत्या

ABOUT THE AUTHOR

...view details