नंदुरबार :नंदुरबार जिल्ह्यातील सारंगखेडा यात्रेतील प्रसिद्ध असलेल्या एकमुखी दत्त महाराजांच्या यात्रोत्सवालायेत्या ८ तारखेपासून प्रारंभ होत आहे. यासाठी यात्रोत्सव समितीच्यावतीने जय्यत तयारी सुरू असून मंदिराला रंगरंगोटी करून भाविकांसाठी सोयी सुविधांची उपलब्धता करून देण्यात येत आहे. त्याचप्रमाणे प्रसिद्ध असलेल्या अश्व बाजारात घोडे दाखल होण्यास सुरुवात झाली असून सुमारे 60 एकरात घोडेबाजार भरणार असल्याची माहिती उत्सव समितीच्या वतीने देण्यात आली (horses entered in Sarangkheda Yatra at Nandurbar) आहे.
अश्व क्रीडा स्पर्धा :यंदा चेतक फेस्टिवलमध्ये मुख्य आकर्षक म्हणजे अश्व क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. अश्व पंढरी म्हणून ओळख असलेल्या सारंगखेडा चेतक फेस्टिवलमध्ये यावर्षी पहिल्यांदाच आश्व क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यासाठी लागणारे धावपट्टी आणि इतर तयारी अंतिम टप्प्यात असून आयोजकांच्या वतीने चेतक फेस्टिवलची तयारी करण्यात येत आहे. फेस्टिवलमध्ये यावर्षी अश्व सौंदर्य स्पर्धा, अश्व नृत्य स्पर्धा, घोड्यांचा रेस तसेच अश्व क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले (900 horses entered in Sarangkheda Yatra) आहे.