महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

डिजिटल नंदुरबार! जिल्ह्यातील ८७ टक्के विद्यार्थ्यांचे आधार कार्ड अपडेट - नंदुरबार विद्यार्थी आधार कार्ड

सरल प्रणाली नुसार विद्यार्थ्यांच्या आधार अपडेटमध्ये नंदुरबार जिल्ह्यात चांगली कामगिरी होताना दिसून येत आहे. आतापर्यंत तब्बल 87.75 टक्के विद्यार्थ्यांचे आधार अपडेट झाले आहेत. दरम्यान आधार अपडेट नसल्यामुळे काही शाळेची संच मान्यतेलाही अडचणी येत आहे. येत्या महिन्यापासून ही प्रक्रिया पूर्ण करण्याचे निर्देश राज्य पातळीवरून देण्यात आले होते. त्यानुसार शिक्षण विभागाने जिल्ह्यातील सर्व शाळांना आदेशित केले आहे.

87 per cent students in Nandurbar have updated their Adhaar Card
डिजिटल नंदुरबार! जिल्ह्यातील ८७ टक्के विद्यार्थ्यांचे आधार कार्ड अपडेट

By

Published : Dec 29, 2020, 2:52 AM IST

नंदुरबार -सरल प्रणाली नुसार विद्यार्थ्यांच्या आधार अपडेटमध्ये नंदुरबार जिल्ह्यात चांगली कामगिरी होताना दिसून येत आहे. आतापर्यंत तब्बल 87.75 टक्के विद्यार्थ्यांचे आधार अपडेट झाले आहेत. दरम्यान आधार अपडेट नसल्यामुळे काही शाळेची संच मान्यतेलाही अडचणी येत आहे. येत्या महिन्यापासून ही प्रक्रिया पूर्ण करण्याचे निर्देश राज्य पातळीवरून देण्यात आले होते. त्यानुसार शिक्षण विभागाने जिल्ह्यातील सर्व शाळांना आदेशित केले आहे.

डिजिटल नंदुरबार! जिल्ह्यातील ८७ टक्के विद्यार्थ्यांचे आधार कार्ड अपडेट

आधार अपडेट नसलेल्या शाळांच्या संचमान्यता अडचणीत..

यावर्षी शाळेचे संचमान्यतेसाठी विद्यार्थ्यांची संख्या स्कूल आणि स्टुडन्ट पोर्टलवर नोंदवावी लागेल. त्या आधारे शाळांना संचमान्यता देण्यात येते. यंदा जवळपास 17 टक्के विद्यार्थ्यांना शाळांची संचमान्यता अडविण्याचत आल्याचे सांगण्यात येत आहे.

जिल्ह्यात विद्यार्थ्यांचे 87 टक्के आधार अपडेट..

जिल्ह्यात एकूण तीन लाख 61 हजार 358 विद्यार्थ्यांपैकी तीन लाख दोन हजार 661 विद्यार्थ्यांचे आधार अपडेट करण्यात आला आहे. तर 58 हजार 737 विद्यार्थ्यांचे आधार अपडेट झालेली आहे. त्यानुसार नंदुरबार जिल्ह्यात एकूण 87 टक्के आधार अपडेट झाल्याची माहिती शिक्षणाधिकारी मच्छिंद्र कदम यांनी दिली आहे.

आधार अपडेट साठी शिक्षकांची दमछाक..

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाउन घोषित केल्यानंतर शाळा बंद असल्यामुळे विद्यार्थी व शिक्षकांचे समन्वय होत नाहीये. त्यामुळे यावर्षी सत्तर टक्के विद्यार्थ्यांचे आधार अपडेट न झाल्यामुळे शिक्षकांना उर्वरित विद्यार्थ्यांचे आधार अपडेट करण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे.

आधार कार्डचा शुभारंभ नंदुरबार जिल्ह्यातून..

दिनांक 29 सप्टेंबर 2010 रोजी नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील येथून आधार कार्डचा शुभारंभ तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या हस्ते करण्यात आला होता. प्रसंगी काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या उपस्थितीत हा सोहळा संपन्न झाला होता.

तालुकानिहाय आधार अपडेट विद्यार्थ्यांची टक्केवारी..

  • नंदुरबार - 86.47 %
  • नवापूर - 87.33 %
  • तळोदा - 85.59 %
  • शहादा - 84.29 %
  • अक्कलकुवा - 79.61 %
  • धडगाव - 74.72 %

ABOUT THE AUTHOR

...view details