नंदूरबार - जिल्ह्यात आतापर्यंत 79 टक्के पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. नंदूरबार जिल्ह्यात या वर्षीच्या खरीप हंगामात 2 लाख 95 हजार हेक्टर क्षेत्रात पेरणी करण्याचे उदिष्ट होते. त्यापैकी आतापर्यंत 2 लाख 29 हजार हेक्टरवर पेरणी झाली आहे. यावर्षी कापसाची मोठ्या प्रमाणावर लागवड करण्यात आली असून, मिरचीची देखील लागवड झाली आहे. आता प्रतीक्षा मोठ्या पावसाची असल्याने बळीराजा वाट पाहत आहे.
नंदूरबार जिल्ह्यात आतापर्यंत 79 टक्के पेरण्या पूर्ण; दमदार पावसाची प्रतीक्षा - नंदूरबार पेरणी न्यूज
जिल्ह्यात आतापर्यंत 79 टक्के पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. नंदूरबार जिल्ह्यात या वर्षीच्या खरीप हंगामात 2 लाख 95 हजार हेक्टर क्षेत्रात पेरणी करण्याचे उदिष्ट होते. त्यापैकी आतापर्यंत 2 लाख 29 हजार हेक्टरवर पेरणी झाली आहे.
नंदुरबार जिल्ह्यात जवळपास 79 टक्के पेरण्या पूर्ण झाल्या असून, राहिलेल्या 21 टक्के पेरण्यादेखील होण्याची शक्यता कृषी विभागाने वर्तवली आहे. यावर्षी कापूस आणि मिरची लागवडीच्या क्षेत्रात वाढ झाली आहे. कापूस लागवडीचे या वर्षीचे 1 लाख 5 हजार 661 हेक्टर इतके क्षेत्र आहे. त्यापैकी 81 हजार हेक्टर क्षेत्रात प्रत्यक्षात लागवड झाली आहे.
जिल्ह्यात सर्वत्र पेरण्या सुरु आहेत, मात्र गेल्या काही दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने आणि कोरोना परिस्थतीमुळे बियाणे आणि खते उपलब्ध होत पेरणी रखडल्याचे चित्र आहे. एकंदरीतच आता बळीराजाला मोठ्या पावसाची अपेक्षा आहे. जर मोठा पाऊस झाला नाही, तर दुबार पेरणीचे संकट शेतकऱ्यांसमोर उभे राहू शकते.