महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नंदुरबार : आष्टे येथे 68 वर्षीय महिला कोरोनाबाधित; तीन गावे सील - कोरोना नंदुरबार

नंदुरबार जिल्ह्यातील रुग्ण कोरोनापासून मुक्त होत असल्याच्या बातम्या येत असताना काल पुन्हा एका पॉझिटिव्ह रुग्णाची भर पडली आहे. आष्टे येथे एका 52 वर्षीय महिलेला कोरोनाची बाधा झाल्याचा अहवाल प्राप्त झाला अन् प्रशासनाची धावपळ सुरू झाली.

आष्टे
आष्टे

By

Published : May 9, 2020, 11:38 AM IST

नंदुरबार - तालुक्यातील 68 वर्षीय महिलेला कोरोनाची लागण झाली आहे. कोरोनामुक्त झालेल्या 52 वर्षीय महिलेचा वैद्यकीय अहवाल निगेटिव्ह आल्याने काल तिला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. तसेच पुन्हा आष्टे येथील एका महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. ही महिला तळोदा तालुक्यातील बोरद येथील मूळ रहिवासी असून आष्टे येथे जावयाकडे दोन महिन्यांपासून मुक्कामाला होती. प्रशासनाने खबरदारी घेत आष्टे व बोरद येथे जंतुनाशक फवारणीसह सर्वेक्षण मोहीम राबविण्यात येत आहे.

नंदुरबार जिल्ह्यातील रुग्ण कोरोनापासून मुक्त होत असल्याच्या बातम्या येत असताना काल पुन्हा एका पॉझिटिव्ह रुग्णाची भर पडली आहे. आष्टे येथे एका 52 वर्षीय महिलेला कोरोनाची बाधा झाल्याचा अहवाल प्राप्त झाला अन् प्रशासनाची धावपळ सुरू झाली. आष्टे येथे संपूर्ण परिसर सील करण्यात आला असून प्रतिबंधात्मक परिसर तयार करण्यात आला आहे. कोरोनाबाधित महिलेची माहिती मिळताच प्रांताधिकारी वसुमना पंत, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.नितीन बोडके, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.जे.आर.तडवी, तहसीलदार भाऊसाहेब थोरात, गटविकास अधिकारी अशोक पटाईत यांच्यासह अधिकारी दाखल झाले होते.

ती महिला मूळची बोरद ता. नंदुरबार येथील असून तेथेही खबरदारी घेण्यात येत आहे. बोरद येथे परिसर सील करून महिलेच्या चार नातेवाईकांचे विलगीकरण करण्यात आले आहे. आमलाड येथील विलगीकरण केंद्रात त्यांना दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, सदर महिला दोन महिन्यांपूर्वी बोरदहून आष्टे येथे मुलीकडे गेली होती. लॉकडाऊनपासून मुलीकडेच राहत होती. यादरम्यान महिला खांडबारा येथे दुसर्‍या मुलीला भेटण्यास गेली होती. तेथील 11 जणांच्या संपर्कात आल्यानंतर त्यांना नवापूर येथे विलगीकरण करण्यात आले आहे.

नंदुरबार येथील रुग्णालय सील

या महिलेला सर्दी, खोकला असा त्रास होऊ लागला होता. त्यामुळे नंदुरबार येथील एका रुग्णालयामध्ये उपचार घेतले होते. त्या ठिकाणी चार दिवस अ‍ॅडमिट राहून उपचार घेतल्याने डॉक्टरांसह 35 जणांचे गृह विलगीकरण करण्यात आले आहे. या दवाखान्यातील आणखी काही जणांचे विलगीकरण होण्याची शक्यता आहे. आष्टे येथील महिलेच्या पाच नातेवाईकांना नंदुरबार येथे विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले असून नंदुरबार, नवापूर व तळोदा येथील कक्षात 20 नातेवाईकांचे विलगीकरण करण्यात आले आहे. या महिलेने कुठे संचार केला याबाबत माहिती घेण्यात येत असून संपर्कात आलेल्या नागरिकांचा शोध घेतला जात आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details